अकोल्यातील सलून व्यावसायिक अनंत कौलकार यांचा उपक्रम…
जिल्हाधिकारी, सीईओ यांच्याकडून कौतुक….
अकोला – संतोषकुमार गवई
लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदार जनजागृतीसाठी अकोल्यातील अनंत कौलकार यांनी पुढाकार घेऊन ‘मतदानाची शाई दाखविल्यास मोफत कटिंग’ करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्हाधिकारी अजित कुंभार व स्वीप नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी यांनी श्री. कौलकार यांच्या पार्लरला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. श्री. कौलकार यांचा उपक्रम कौतुकास्पद असून, इतर नागरिकांनीही मतदार जागृती व मतदानाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन श्री. कुंभार व श्रीमती वैष्णवी यांनी केले.
श्री. कौलकार हे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्याचअंतर्गत लोकसभा निवडणूकीतही त्यांनी हा उपक्रम राबवला होता. त्याचा लाभ शेकडो ग्राहकांनी घेतला. त्यांच्या या उपक्रमाचे पदाधिकारी, अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दिवशी मतदानानंतर बोटावरील शाई दाखवल्यास रामदासपेठ येथील अनंत कौलकर यांच्या केसकर्तनालयात येणाऱ्या मतदारांची मोफत कटिंग करून देण्याचा संकल्प कौलकर यांनी घेतला आहे.