Saturday, December 21, 2024
Homeराज्यमाजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली मनसर येथील मृतकाच्या कुटुंबाला भेट...

माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली मनसर येथील मृतकाच्या कुटुंबाला भेट…

रामटेक – राजु कापसे

मनसर येथील रहिवासी कुमार.आर्यन किशोर केकते वय 15 वर्ष.याची रामटेक वरून इतवारी नागपूर कडे जाणाऱ्या रेल्वेने मनसर परिसरात कटुन मृत्यू झाला होता.अचानक घडलेल्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच मृतकाच्या कुटुंबच नव्हे तर संपूर्ण मनसर परिसर शोकात गेल्याचे चित्र होते.

घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून मृतकाच्या कुटुंबातील सदस्यांना भेटून त्यांचं मनोबल वाढवून त्यांना धीर देण्यासाठी मृतकाच्या कुटुंबाला माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी भेट दिली. व मृतकाच्या कुटुंबाला शासनामार्फत व स्वतःकडून देखील शक्य ती आर्थिक मदत करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी मृतकाच्या कुटुंबाला दिले.

यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह माजी सभापती कला ठाकरे, माजी ग्रामपंचायत सदस्या कंचन धनोरे, संतोष बोरीकर, सामाजिक कार्यकर्ते रॉकी चवरे, धर्मदीप कुमरे, ईशु वानखेडे, गणेश सार्वे, सौरभ सावकार, राकेश चिंचुलकर, आकाश पवार, वंश राजपूत व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: