Thursday, September 12, 2024
spot_img
HomeBreaking Newsमूर्तिजापूर | जीवन प्राधिकरणाच्या २ अधिकार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल...थेट २९ वर्षीय तरुणीसोबत...

मूर्तिजापूर | जीवन प्राधिकरणाच्या २ अधिकार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल…थेट २९ वर्षीय तरुणीसोबत कार्यालयातच केले गैरवर्तन…

मूर्तिजापूर : बातमी आहेय अकोल्यातून…जिल्हा परिषद शाळेत एका 9 वर्षीय मुलीवर लैगिंग अत्याचाराचा प्रयत्न करण्याची घटना ताजी असताना पुन्हा अकोल्यातून एक संतापजनक प्रकार समोर आलाय. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या जिवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात चक्क दोन अधिकाऱ्यांनी २९ वर्षीय तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केलीय.. इथेच न थांबता तिच्यावर बळजबरी करित चुंबन (KISS) घेतलाय. असा आरोप तरुणीने केलाय, पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून मुर्तिजापूर पोलिसांत दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विनय भंगाचा गुन्हा दाखल झालाय. हा संपूर्ण प्रकार मुर्तिजापूर जिवन प्राधिकरण कार्यलयात घडला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीला चांगलाच जोर धरतो आहे.

नेमकं काय होतंय संपूर्ण प्रकरण?…

मूर्तिजापूर शहरातल्या जिवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात २९ वर्षीय तरुणी कंत्राटी कंम्प्युटर आपरेटर म्हणून कार्यरत आहे. मागील महिन्यांपासून तिचा पगार थकीत आहे, पीडित तरुणी कार्यलयातील शाखा अभीयंता डी.बी. कपिले यांच्याकडे पगारासाठी विनवणी करायची. मात्र पाहिजे तसा प्रतिसाद अधिकारी देत नव्हते. अखेर दुय्यम अधिकारी ‘आर इंगळे’ यांना भेटली असता आपण SDO नाही, काही करू शकणार नाहीये, असं म्हणत पगार काढण्यासाठी शरीर सुखाची मागणी घातली. तसेच 20 जून रोजी कपिले यांच्या चेंबरमध्ये तरुणी पगाराची विचारणा करण्यास गेली असता तरुणी एकटी असल्याची संधी साधत..तिच्या बळजबरी करण्याचा प्रयत्न केलाय. तरुणीने विरोध केला असता तरुणी कामावरून काढण्याची धमकी देऊ लागला.. अखेर तरुणीनं घडलेला सर्व प्रकार कुटूंबियांना सांगितला. लागलीच कुटूंबियांनी मूर्तिजापूर पोलीस स्टेशन गाठलं. तरुणीच्या तक्रारीवरून शाखा अभीयंता डी.बी. कपिले आणि आर. इंगळे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्यस्थित याप्रकरणी PSI अरुण मेश्राम अधिक तपास करतायत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: