Saturday, December 21, 2024
Homeराज्यशंतनू इंटरप्राईजेसला आग ८० लाखाचे नुकसान...

शंतनू इंटरप्राईजेसला आग ८० लाखाचे नुकसान…

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

ता 26 मालेगाव शहरातील शेलु फाट्यावरील शंतनू इंटरप्राईजेस या इलेक्ट्रिकल प्लंबिंग व हार्डवेअर च्या दुकानाला आग लागल्याचे आज ता 26 रोजी सकाळी 5.00 वाजताच्या दरम्यान लक्षात आले.

वैजनाथ तायडे यांचे शेलू फाट्यावर शंतनू एंटरप्रायजेस हे इलेक्ट्रिकल्स ,प्लांबिंग हार्डवेअर चे दुकान 12फूट x60फूट आकाराचे टिन शेड मध्ये होतेया दुकानाला आग लागल्याची बाब आज सकाळी लक्षात आली त्यानंतर मालेगाव नगर पंचायत व वाशिम नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या सकाळी 7.30 वाजता ही आग आटोक्यात आली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्माच्यार्यानी परिश्रम घेतले.

आगीच्या नुकसानीचे कारण समजू शकले नाही वैजनाथ तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या दुकानातील नगदी 2 लाख 50 हजार रुपये ,इलेक्ट्रिकल, प्लांबिंग ,कलर ,हार्डवेअर चे दुकान दुकानातील मोटरसायकल इत्यादी 80 लाखा पेक्षा जास्त रक्कमेचा ऐवज आगीचे भक्ष्य झाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: