Sunday, September 22, 2024
HomeमनोरंजनFighter | फायटर चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज...हृतिक-दीपिकासह 'हे' कलाकार देशासाठी जीव धोक्यात...

Fighter | फायटर चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज…हृतिक-दीपिकासह ‘हे’ कलाकार देशासाठी जीव धोक्यात घालायला तयार…

Fighter : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या एरियल अ‍ॅक्शन चित्रपट ‘फायटर‘द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटातील गाणी आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती.

आता प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये, हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर हवाई दलातील अधिकारी म्हणून देशभक्तीच्या भावनेत बुडलेले दिसत आहेत.

ट्रेलरची सुरुवात हृतिक रोशनच्या आवाजाने होते की, फाइटर वह नहीं है, जो लक्ष्य को प्राप्त करता है, बल्कि फाइटर वह है, जो अपने दुश्मनों को ठोक देता है। अनिल कपूर कॅप्टन म्हणून हवाई दलातील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांची एक टीम तयार करतो, ज्यात हृतिक, दीपिका आणि करण यांचा समावेश होतो. त्यानंतर पुलवामा बॉम्बस्फोटानंतर सर्व लढवय्ये युद्धासाठी सज्ज होतात आणि आपला जीव धोक्यात घालताना दिसतात.

यावेळी, सर्व फाइटर अनेक आव्हानांना तोंड देत आहेत, ज्यावर ते कदाचित त्यांच्या आनंदाचा त्याग करून मात करणार आहेत. फायटरच्या ट्रेलरमध्येही हृतिक आणि दीपिका यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळाली होती, मात्र रणांगणात त्यांना प्रेमाचा त्याग करावा लागणार असल्याचे संकेत ट्रेलरमध्ये देण्यात आले होते. ट्रेलरमध्ये हृतिक, अनिल कपूर आणि दीपिका देशासाठी लढताना आणि त्यांची दमदार अ‍ॅक्शन पाहायला मिळाली जो प्रेक्षकांचाही उत्साह वाढवण्यासाठी पुरेसा आहे.

‘फायटर’मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. फायटरमध्ये हृतिक रोशन स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया उर्फ ​​पॅटीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ ​​मिनीची भूमिका साकारत आहे.

या दोन सुपरस्टार्सशिवाय, अनिल कपूर देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे, जो ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग उर्फ ​​रॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘फायटर’ची निर्मिती व्हायकॉम18 स्टुडिओ आणि मार्फलिक्स पिक्चर्स यांनी केली आहे. सिद्धार्थ आनंद आणि त्याची पत्नी ममता आनंद यांनी चित्रपट निर्माते म्हणून पदार्पण केले आहे. सिद्धार्थ आनंदने यापूर्वी ‘वॉर’ आणि ‘पठाण’ सारखे यशस्वी अ‍ॅक्शन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

‘फाइटर’मध्ये हृतिक, अनिल, दीपिका याशिवाय करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, तलत अझीझ आणि इतर सहाय्यक भूमिकांसह उत्कृष्ट स्टारकास्ट आहेत. विशाल-शेखर जोडी चित्रपटासाठी गाणी आणि मूळ गाणी तयार करत आहेत. एरियल अ‍ॅक्शन फिल्म 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: