Monday, December 23, 2024
HomeBreaking NewsFarmers Protest | शेतकऱ्यांचा दिल्लीत प्रवेश रोखण्यासाठी सीमेवर पोलीस-CRPF तैनात…

Farmers Protest | शेतकऱ्यांचा दिल्लीत प्रवेश रोखण्यासाठी सीमेवर पोलीस-CRPF तैनात…

Farmers Protest : आज दिल्लीत पंजाब-हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी मोठ्या संख्येने जमणार होते, त्यापूर्वीच शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश मिळू नये यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलीस, CRPF जवानांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) यासह अन्य मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटना आज 13 फेब्रुवारीला दिल्लीकडे मोर्चा काढणार आहेत, चंदीगडमध्ये सोमवारी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीची बैठक झाली, ती 5 तास चालली, मात्र ती अनिर्णित राहिली.

किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली हजारो शेतकरी सीमेवर उभे आहेत. यावेळी दिल्ली पोलिसांनीही शेतकऱ्यांना कोणत्याही किंमतीत दिल्लीत येऊ देणार नाही असा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिस आणि सीआरपीएफचे जवान पूर्णपणे सज्ज आहेत. बॅरिकेड्स, अवजड सिमेंट बॅरिकेड्स, कंटेनर, डंपर टाकून रस्ता अडवण्यात आला आहे. दिल्लीच्या आसपासच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: