Thursday, September 19, 2024
Homeराज्यकाँग्रेसचे रिसोड मालेगाव विधानसभा चे आमदार अमित झनक यांच्या चर्चेला पूर्णविराम...

काँग्रेसचे रिसोड मालेगाव विधानसभा चे आमदार अमित झनक यांच्या चर्चेला पूर्णविराम…

मालेगाव – चंद्रकांत गायकवाड

काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या कॉग्रेस पक्ष सोण्डया च्या विषयी उलट सुलट चर्चेला समाज माध्यमांवर आज सकाळ पासुन उधाण आले होते. त्यावर आमदार अमित झनक यांनी एक वीडीओ क्लीप तयार करून कॉग्रेसचे झनक कुटूंबीयांवर खूप प्रेम आहे. कुठे जाण्याचा प्रश्न नाही असा वीडीओ व्हायरल केल्याने चर्चला पूर्ण विराम मिळाला आहे.

तसेच बातम्या सर्वत्र झळकत असताना त्यांच्यासह काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्तही पसरविण्यात येत आहे. त्यात मालेगाव रिसोड क्षेत्राचे आमदार अमित सुभाष झनक यांचे नावही इलेक्ट्रॉनिक मीडियातून पुढे आल्याने मालेगाव रिसोड च्या राजकीय वर्तुळात बरीच खळबळ उडाली आहे.

वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असलेले आ.अमित सुभाष झनक यांनी मात्र आपण काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आपल्याबाबत समाजमाध्यमातून तसेच काही इलेक्ट्रॉनिक मीडियामधून खोडसाळपणे, निराधार वृत्त पसरविण्यात आलेले आहे.

माझे वडील काँग्रेसमध्येच होते. युवा अवस्थेपासून आपण काँगेसशी एकनिष्ठ आहोत. पुरोगामी विचाराशी बांधिलकी असलेल्या काँगेससोबतच आहे. तसेच कोणीच भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नाही.

मालेगाव रिसोड तालुक्यात काँग्रेसची बाजू भक्कम असून येत्या निवडणुकीत लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा काँग्रेसच जिंकेल असा विश्वासही आम्ही निष्ठावंत, काँग्रेसमध्येच आहोत, अफवांवर विश्वास ठेवू नका आमदार . अमित सुभाष झनक यांनी व्यक्त केला आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: