मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
मालेगाव – तालुक्यातील महामार्गावर वसलेले जऊळका रेल्वे येथे दि.6 रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तथा जऊळका गावाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल जाहीर आभार, सत्कार, व भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
झी टॉकीज फेम कु. शीतलताई साबळे पाटील यांनी आपल्या कीर्तनातून तरुण पिढीला उपदेश करीत पोरं हो…..एकदाचे आपल्या ( जऊळका रेल्वे) ग्रामपंचायत गटारात पडा पण मुलींच्या प्रेमात मात्र पडू नका,आपल्या माय बापाला लोकांसमोर शरमेने मान खाली घालायला लावू नका…यावरून उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण होऊन दोन तास कीर्तन करण्यासाठी आलेल्या कीर्तनकार यांना जर गावाचा किती विकास झाला हे कळू शकते तर मग स्थानिक पुढारी यांना का नाही दिसत.तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा व जिल्हा परिषद निवडणूका डोळ्यासोर ठेवून काही चले चपाटयानी स्वहित साधण्यासाठी कार्यकर्ते गोळा करून मोठेपणाचा आव आणत असल्याचे स्थानिक नागरिकांमधून विषय चर्चिल्या जात आहे.
मात्र झी टॉकीज फेम राहुरी जि.अ.नगर येथील हभप कु. शितलताई साबळे पाटील यांच्या भव्य कीर्तन सोहळ्यासाठी हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.मात्र वरून राजाच्या हजेरी,अन् आयोजकांचा मी पणाच्या तोऱ्यात ढिसाळ नियोजन शून्य कारभार व व्यवस्था पाहून झी टॉकीज फेम कीर्तन सोहळ्याकडे हजारो ग्रामस्थांनी पाठ फिरवित फक्त शेकड्यावर ग्रामस्थांची उपस्थिती लाभलेली पहावयास मिळाली. या वरून येणारा काळ हा तारक ठरण्यापेक्षा मारकच जास्त ठरणार असल्याचे उपस्थित असलेल्या स्थानिक मतदार यांच्या मधील चर्चे मधून दिसून येत आहे.