भारतात उन्हाळा सुरु झालेला आहे. आणि नागरिकांना उन्हाचा तडाखा सुद्धा जाणवायला लागला आहे. ज्यामुळे बाजारात थंड पेयांची विक्री वाढली असून गारवा देणाऱ्या वस्तूंच्या मागणीतही मोठी वाढ दिसून येत आहे. आणि त्याबरोबरच या ढगधगत्या उन्हाळ्यामध्येच मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमझान देखील सुरु झालेला आहे.
मुस्लिम धर्मिय बांधव वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या रमजान च्या महिन्यात त्यांच्याकडून दररोज रोजा (उपवास) ठेवला जातो. या उपवासाच्या काळात ते अन्नच नाही तर पाणिसुद्धा सेवन करत नाहीत.
या ढगधगत्या उन्हामध्ये विना पाण्याचे राहणे ही कल्पनाही जिथे आपल्या सारख्या सामान्याला करवत नाही अशा उन्हाळ्यामध्ये मुस्लिम धर्मीय विना अन्न-पाणी सेवन करता दिवस काढतात. घरातील लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वच जण या रोजाचे काटेकोरपने पालन करतात.
परंतु अशा पवित्र रमजान महिन्यात मुस्लिमांना त्रास देण्याचा खोळसांडपणा महावितरनकडून करण्यात येत असल्याचे किनवट मध्ये पाहायला मिळत आहे. एरवी दिवसातून बोटावर मोजता येईल त्यापेक्षाही कमी-वेळा खंडित होणारा विद्युत प्रवाह रमजान सुरु झाल्यापासून मात्र दिवसभरात दर पाचव्या दहाव्या मिनिटाला खंडित होतोय. यासंदर्भात जर महावितरन कार्यालयात कुणी विचारणा केली तर उडवा-उडवीची उत्तरे कार्यालयातून येतात.
संदर्भात किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्याशी संपर्क केला असता मतदारसंघात शासकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून शासन नागरिकांना सोई-सुविधा पुरवण्यात सपशेल नाकाम ठरल्याच मत त्यांनी व्यक्त केलंय.
व तसेच आम्ही आमच्या पातळीवर ताकद लावून आपल्या मतदार संघात शक्य तेवढी लाईट असावी यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच जनता सरकारच्या या भोंगळ कारभाराला कंटाळली असून यावेळी जनता या सरकारला साफ नाकारेल असं परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केल.
तर उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो व तसेच मांडवी येथील यंत्रनेवर लोड वाढत असल्याने नागरिकांना या समस्याचा सामना करावा लागत असून संबंध महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु येत्या काही दिवसात ही परिस्थिती सुधारेल अशी प्रतिक्रिया किनवट-माहूर मतदार संघांचे आजी आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केली आहे.
तर किनवट येथील पत्रकार नसिर तगाले यांनी हा अधिकाऱ्यांचा खोळसांडपणा असून अशा अधिकाऱ्यांना चपलेचे हार घालायला हवेत अशा कडक शब्दात सुनावले तसेच यावर लवकर उपाय न निघाल्यास मुस्लिम समाज जण आंदोलन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला