Tuesday, December 24, 2024
Homeराज्यतांत्रिक डायरी २०२३ चे उत्साहात प्रकाशन...

तांत्रिक डायरी २०२३ चे उत्साहात प्रकाशन…

नरखेड – दिनांक २८ डिसेंबर रोजी तांत्रिक कामगार युनियन (५०५९) च्या तांत्रिक डायरी २०२३ चा प्रकाशन सोहळा लोकनेते,पद्मविभूषण सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात गणेश कला व क्रीडा रंगमंदिर, पुणे येथे साजरा करण्यात आला, यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,सातारा लोकसभा खासदार व सिक्किम चे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,

संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रविण दादा गायकवाड तसेच चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव,अशोक समर्थ यांच्या सह शैक्षणिक, राजकीय, उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अनेक मान्यवरांनी तांत्रिक डायरी पाहून कौतुक केले व कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या तांत्रिक कामगार युनियन (५०५९) ने आपल्या सभासदांना अनेक महत्वाची माहिती या डायरी मार्फत उपलब्ध करून दिली आहे तसेच यामुळे आपल्या रोजच्या दिनचर्येच्या नोंदी आपल्याला ठेवता येतील.तांत्रिक कामगार युनियन चे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले.

यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, सरचिटणीस प्रभाकर जी लहाने, उपसरचिटणीस शिवाजी शिवणेचारी व नितीन भैय्या चव्हाण,राज्यसचिव आनंद जगताप, तांत्रिक डायरी चे संपादक सुरेश माळवे व तांत्रिक ॲप्रेंटीस,कंत्राटी कामगार (कर्म) असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे व यांच्यासोबत अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: