महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान…
नागपूर – शरद नागदेवे
महिला आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. आपल्या कर्तृत्वाने महिलांनी प्रत्येक क्षेत्रात छाप सोडली आहे. महिलांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन आहे. या सर्व महिलांचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी केले.
अखिल भारतीय हिंदी संस्था संघ, नवी दिल्ली, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा (विदर्भ प्रांत), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अ.भा.हिंदी संस्था संघ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा आणि अ.भा. नाट्य परिषदेचे अध्यक्ष अजय पाटील होते.
याप्रसंगी राजकारण, पर्यावरण, साहित्य, उद्योग, शिक्षण, अभिनय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कारमूर्तीमध्ये मायाताई ईवनाते (राजकारण), अनुसया काले छाबरानी (पर्यावरण), सना पंडित (साहित्य), स्वप्ना नायर (उद्योग), शुभदा फडणवीस (लेखिका), रेखा दंडीगे घीया (सामाजिक चळवळ), ममता जैस्वाल (व्यवसाय), रचना सिंह (शिक्षा), भाग्यश्री चिटनीस (अभिनय), आसरा खुमुशी (वैद्यकीय) आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय पाटील यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाचे कौतुक केले. हा सत्कार म्हणजे समाजात काम करणाऱ्या महिलांच्या कामाला बळकटी देणे होय, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रगती पाटील, अनिल नायर, मनीष जैस्वाल, आभा मेघे, सुनीता मुंजे, अनंत जगनीत ऊस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन शिवांगी गर्ग यांनी केले. आभार मनोज पांडे यांनी मानले. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.