दानापूर – गोपाल विरघट
पत्रकार हे आजच्या काळातील प्रतिसुष्टीचे निर्माते असून कर्तव्यावर असणाऱ्या लोकांना अधिकारांची जान करून देण्याचे काम पत्रकारांचे आहे. तसेच प्रबोधनकारांची वाणी व पत्रकारांची लेखणी यांनी जर हातात हात घालून काम केले तर सामाजिक परिवर्तन चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा आशावाद ह.भ.प.भागवतचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना (ऑल जर्नालिस्ट अँड फेण्ड्स सर्कल) शाखा तेल्हाराच्या वतीने श्रीक्षेत्र ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे आयोजीत आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले.
त्यांनी यावेळी संघटनेच्या कार्यपद्धतीची प्रशंसा करीत या मेळाव्याच्या निमित्ताने पत्रकारांच्या अडचणी सोडविल्या जाऊ शकतात, असेही मत व्यक्त केले. या मेळाव्याचे प्रमुख अतिथी राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना या संघटनेचे राज्याध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार निलेश पोटे, पो.स्टे.हिवरखेड चे ठाणेदार विजय चव्हाण, प्रेस क्लब चे संस्थापक श्यामशील भोपळे, संघटनेचे मार्गदर्शक संजय आठवले, राज्यकार्यकारी सदस्य सदानंद खारोडे,विभागीय अध्यक्ष राहुल कुलट, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष किरण सेदानी, जिल्हा उपाध्यक्ष सारंग कराळे, जिल्हासंघटक चंचल पितांबरवाले, पत्रकार विनोद राठोड, लोकजागरचे हिवरखेड शहराध्यक्ष महेंद्र कराळे,नीरज शहा यांची उपस्थिती होती.
या मेळाव्याच्या प्रास्तविकात किरण सेदानी यांनी मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश व संघटनेच्या जिल्हापातळीवरील कार्यबांधणीचे स्वरूप सांगितले. या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना संघटनेचे राज्याध्यक्ष निलेश पोटे यांनी पत्रकारांच्या समस्या, त्यावर उपाययोजना याबाबत विचार व्यक्त केले. यात त्यांनी भविष्यात संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी पतपेठीची उभारणी, प्रशिक्षण व रोजगार निर्मितीचा मार्ग शोधला जाईल असे सांगितले.
या माध्यमातून पत्रकारांचे सक्षमीकरण व संघटन करता येईल. जिल्ह्यात संघटनेची व्यापकता वाढत असल्याचे समाधान पोटे यांनी व्यक्त केले. संजय आठवले यांनी पत्रकारिता निपक्षपणे करावी. पत्रकारिता करतांना जोखीम पत्कारता आली पाहिजे त्यासाठी पत्रकारांनी पत्रकारिता करतांना सबळ पुरावा ठेवावेत यासह इतरही बाबीचे विवेचन यावेळी व्यक्त केल्या. या मेळाव्यात पत्रकार स्व. निलेश पत्की यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पत्रकार सचिन कोरडे यांना कृषी मित्र पुरस्कार व केळी उत्पादक शेतकरी संघ तेल्हारा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आणि श्री ज्ञानेश आश्रमचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर भालतिलक यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
अकोला व तेल्हारा कार्यकारणी मधील नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांना नियुक्ती पत्राचे वाटप व स्वागत यावेळी करण्यात आले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी ajfc तालुका अध्यक्ष मनिष भुडके,जिल्हा सरचिटणीस सुनीलकुमार धूरडे, जमीर शेख,बाळासाहेब नेरकर, विलास बेलाडकर, जितेंद्र लाखोटीया, नागोराव तायडे,फारुख सौदागर,केशव कोरडे, रितेश टीलावत, शेख राजू, देवानंद खिरकर,मनोज भगत,दीपक कडू, शेहजाद खान,गोपाल विरघट, विनोद सगणे, स्वप्नील इंगळे,सखाराम नटकूट,नंदकिशोर नागपुरे,संजय हागे, गौरव वानखडे, रवी वाकोडे, सतीश इंगळे आदींनी परिश्रम केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा.संतोषकुमार राऊत व आभारप्रदर्शन तालुका अध्यक्ष मनिष भुडके यांनी केले.