Air Asia : केरळमध्ये रविवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर एशियाच्या विमानाचे टेकऑफनंतर काही वेळातच आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानातील सुमारे 168 जणांचा श्वास रोखला गेला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोचीहून बेंगळुरूला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाने रविवारी रात्री ११ वाजता केरळमधील कोची येथील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमान परत उतरवण्यात आल्याचे वृत्त आहे. विमान कंपनी आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानात हायड्रॉलिक समस्या होती.
विमानात 168 प्रवासी आणि 6 कर्मचारी होते.
अधिका-यांनी सांगितले की, विमानात 168 प्रवासी आणि सुमारे 6 क्रू मेंबर्स होते. दुसरीकडे ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांचा श्वास रोखला गेला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. इमर्जन्सी लँडिंग असले तरी लँडिंग सुरक्षितपणे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.