अमरावती – दुर्वास रोकडे
शेतकरी हा देशात अत्यंत महत्त्वाचा घटक असताना देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे केंद्र आणि राज्य शासनाकडून सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे , शेतकऱ्याच्या उत्पादनांना हमीभाव मिळत नाही, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला.
शासनाविरोधात घोषणाबाजी देत दुपारी हा मोर्चा इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर ,माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले.
देशात कोणीही उपाशी पोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी उन, पाऊस, थंडी, वादळ वारा यांचा विचार न करता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पुरवठा पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवील्यास सर्व जनजीवन उध्वस्त होईल. शेतकरी जगला तरच जग जगेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण सातत्याने लढत राहू असे आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणात एक वाक्यता नाही तसेच शेतकऱ्यांबद्दल दोन्ही सरकारांची नियत चांगली नाही. त्यामुळे शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी सुध्दा केलेली नाही. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी व अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले ,परंतु याची मदत देखील अद्याप शेतकऱ्यांना पोहोचली नाही, मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढला.
मात्र ,यातील 50% शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कमच मिळाली नाही ,अलीकडे मोठ्या आर्थिक लाभाच्या योजना शासन जाहीर करीत आहे. जुन्या योजनांचे पैसे मात्र रोखून ठेवलेले आहे ,आजही निराधार योजना असो की आवास योजना असो याचा निधी शासन स्तरावर रखडलेला आहे, त्यामुळे कित्येकांची घरकुल अर्धवट आहेत. कित्येक लाभार्थ्यांचे निधी अभावी घराचे बांधकाम सुरू केल्याने रस्त्यावर आलेले आहेत, चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतीचे नुकसान झाले.
मात्र, मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही , त्यामुळे या मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा कार्यलयावर हल्लाबोल केला शेतकऱ्यांच्या उत्पादनांना किमान आधारभूत किंमत देऊन त्याचा कायदा तयार करावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. सोबतच, राहुलजी गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे खा.अनुराग ठाकूर यांच्या तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला .आंदोलनात सुधाकर भारसाकळे,हरिभाऊ मोहोड,बाळासाहेब हिंगणीकर,संजय मार्डीकर,
प्रकाश काळबांडे,रामेश्वर अभ्यंकर, सतीशराव हाडोळे, श्रीकांत गावंडे,गिरीशराव कराळे,राम चव्हाण,दिलीप काळबांडे,दयाराम काळे,प्रदीप देशमुख,अरुण वानखडे, प्रवीण मनोहर,रवी पटेल,मुक्कदर खाँ पठाण,समाधान दहातोंडे,प्रकाश चव्हाण,गुणवंत देवपरे,अमोल होले,निशिकांत जाधव,नामदेव तनपुरे,किशोर देशमुख,सहदेव बेलकर, सुधाकर तलवारे,सतीश पारधी,मनोज गेडाम,अमित गावंडे,अभय देशमुख, महेंद्रसिंह गैलवार,श्रीकांत झोडपे,प्रदीप देशमुख,जहीर शेख,सागर कलाने,मुख्तार भाई,मन्ना दारसिंबे,विनोद पवार,आतिश शिरभाते,श्रीनिवास सूर्यवंशी,अमोल ढवसे,भूषण कोकाटे,भाई देशमुख,सुनील गावंडे,हरीश मोरे, श्रीधर काळे,अंकुश ठाकरे,सिध्दार्थ बोबडे,उत्कर्ष देशमुख, नितेश वानखडे यांची उपस्थिती होती.
शेतकरी विरोधी शासन
शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात अनेक आर्थिक योजनांच्या घोषणाबाजी सुरू आहे ,परंतु यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा व आर्थिक लाभाचा एकही घोषणा या शासनाकडून केली जात नाही, नुकसान भरपाई त्यांना अद्यापही मिळाली नाही, आजही शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात या अन्याय होत आहे यावरून हे शासन किती शेतकरी विरोधी आहे हे लक्षात येईल,
आमदार ॲड. यशोमती ठाकूर.
शेतकऱ्यांच्या हिताकरिता रस्त्यावर उतरू
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, परंतु अद्यापही त्यांना एक रुपयाची मदत देण्यात आली नाही, मागील पीक विम्याची रक्कम त्यांना मिळाली नाही, केवळ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची फसवणूक करण्याकरता आर्थिक लाभाच्या योजना सुरू करीत आहे ,परंतु कित्येक जुन्या योजनांचे अद्यापही नागरिकांना पैसे दिले नाही ,त्यामुळे घरकुलाचे काम रखडले आहे, या मागण्यांसाठी आता रस्त्यावरून तीव्र आंदोलन करू,
जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटी