अकोला – राज्यातील भाजपच्या महायुती शासनाने राज्यातील शासकीय व स्वायत्त स्वस्थांच्या शाळा विकण्याचा सपाटा लावला आहे. स्वायत्त संस्थांच्या शाळा भाजप शासन बंद करून ते उद्योगपत्यांच्या घशात घालीत आहे.
शिक्षणाची सर्वत्र पीछेहाट होत असून अशा शिक्षणाची राखरांगोळी करणाऱ्या भाजप महायुतीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना ही राज्यभरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी व्यापक प्रचार करीत आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातही नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटनेने आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांना जाहीर केला आहे. मतदार संघातील शिक्षक व पदवीधर युवक,युवती सुशिक्षित कल्पक व शिक्षणाची तमा बाळगणारे डॉ अभय पाटील यांना मोठ्या संख्येने निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात संविधान टिकवण्यासाठी तथा पदवीधर युवक युवतींना रोजगार तसेच शैक्षणिक समस्या, जुनी पेन्शन योजना, कास्तकार आदींच्या हितासाठी महाविकास आघाडी कटीबद्ध असल्यामुळे महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना ही महाविकास आघाडीला विजयी करण्यासाठी प्रचार अभियान राबवित आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश म्हसाये, राज्याध्यक्ष पद्मावती टिकार, उपराज्याध्यक्ष प्रा संजय तुपे आदींच्या मार्गदर्शनात
अमरावती विभागातही अमरावती विभागीय अध्यक्ष अतुल अमानकर, जिल्हा कार्यवाहक अकोला विश्वास आहेरकर, जिल्हा संघटक सागर मते, तालुका संघटक जमील शहा, जिल्हा संघटक हरिभाऊ घायल आदी प्रचार अभियान राबवत असून यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनाही पाठिंबा पत्र बहाल केले आहे. शिक्षक व पदवीधर युवक युवतीच्या च्या या पाठिंबामुळे काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या मताधिक्यात वाढ होणार आहे.