आकोट – संजय आठवले
आकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळात अत्यल्प पावसाने पिकाची परिस्थिती अत्यंत नाजूक झाल्याने अत्यल्प उत्पादन मिळत आहे. त्याचप्रमाणे या अत्यल्प पावसचा पुढील रब्बी हंगामावर ही मोठा दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे ह्या मंडळात दुष्काळ जाहीर करून येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा टाहो येथील शेतकऱ्यांनी फोडला आहे.
२०२३ या खरीप हंगामात वरील महसुल मंडळात जुन ते सप्टेंबर पर्यंत फारच कमी पाऊस झाला. जुलै मध्ये कमी पावसातच शेतकर्यांनी पेरणी केली. त्यानंतर ऑगष्ट ते सप्टेंबर मध्ये जवळपास २०-२१ दिवसाचा पावसात खंड पडत राहिला. कसे तरी थोड्या फार प्रमाणात पाऊस येऊन पिक जिवंत राहिले. मुंग उडिद तर अगोदरच शेतकऱ्यांनी वखरून टाकले. त्यामुळे सर्व आशा परतीच्या पावसावर लागल्या होत्या. त्याआधारे सोयाबीन कापाशी व तुर येईल या आशेवर शेतकऱ्यांनी चांगली मशागत केली.
तसेच महागडी रासायनीक खते, फवारे मारुन अतोनात खर्च केला. परंतू परतीच्या पावसाने सूध्दा या महसूल मंडळात हुलकावणी दिली आहे. त्यामुळे सोयाबीनचा उतारा एकरी २ ते ३ क्विंटलच आहे. त्यात उत्पादन खर्चही निघत नाही.
आज रोजी (कापाशी) पर्हाटी सुध्दा सुकण्यास सुरुवात झाली आहे. तुरीचे पिक तर अशा परिस्थीतीत तगच शरु शकत नाही. तसेच पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी पिक सुध्दा गेल्यात जमा आहे. कर्ज काढून हाता तोंडाशी आलेले पिक सुकत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
त्यामुळे आसेगांव महसूल मंडळातील सर्व जमिनीचा सर्वे करून मंडळातील सर्व गावे दूष्काळग्रस्त जाहिर करावी.
पिक विमा सरसगट देण्यात यावा. पिक कर्ज माफ करावे. आणि दुष्काळग्रस्तांना ज्या सवलती असतात त्या लागू कराव्या. अशा मागण्या येथिल शेतकर्यांनी केल्या आहेत.
तहसीलदार आकोट यांना दिलेल्या निवेदनावर डॉक्टर गजानन महल्ले, राजेश पाचडे, संजय पाचडे, अजबराव मोकळकार, उमेश कात्रे, पद्माकर विधोळ, पवन ढेपे, कैलास टोलमारे, शिवाजी सपकाळ, देविदास नागले, डॉक्टर अरविंद लांडे, प्रभाकरराव सपकाळ, विठ्ठल ठाकरे, गोपाल सराटे, अभिषेक पाठक, विजय बिहाडे, विशाल चौधरी, प्रतीक ठाकरे, राजू धांडे, प्रमोद राऊत, लक्ष्मण कळसकार, भरत कळस्कार, शाम पाचडे, गजानन मदनकर, गजानन शिरस्कार, सागर मदनकर यांच्या स्वाक्षर्या आहेत.