Wednesday, July 17, 2024
spot_img
HomeSocial TrendingViral Video | हा माणूस आधी कारला धडकला...नंतर ट्रकखाली आला तरीही त्याला...

Viral Video | हा माणूस आधी कारला धडकला…नंतर ट्रकखाली आला तरीही त्याला ओरखडा आला नाही…

Viral Video : रस्त्यावर होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांची खबरदारी घ्यायला पाहिजे, त्यासाठी नेहमीच रस्त्यावर गाडी चालवताना खूप सतर्क राहायला हवं. कारण संकट कुठून येईल याची कोणालाच कल्पना नाही. नुकताच व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहा. यामध्ये एक व्यक्ती भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दिसत आहे.

अचानक तो ट्रक आणि कारमधील एका छोट्या जागेतून आपली बाईक काढण्याचा प्रयत्न करू लागतो, परंतु एक कार चालक त्याच्या कारचा दरवाजा उघडतो, ज्यामुळे ती व्यक्ती धडकतो आणि खाली पडतो. मात्र तो खाली पडताच एक टँकर त्याच्या अंगावर धावून आला. सुदैवाने वाहनाचा टायर त्याच्या अंगावर गेले नाही. तो टँकर आणि जमिनीत अडकतो. ताबडतोब ड्रायव्हर गाडी थांबवतो आणि ती व्यक्ती खालून रेंगाळत बाहेर येते.

व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर (@cctvidiots) नावाच्या अकाऊंटद्वारे पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- एका निष्काळजी महिलेमुळे पुरुषाच्या जीवाला धोका होता. खरंतर, फुटेज पाहता, एखाद्या महिलेने कारचा दरवाजा उघडल्याचा भास होतो. मात्र व्हिडीओ अस्पष्ट असल्याने गाडी उघडणारी व्यक्ती महिला आहे की पुरुष हे स्पष्ट होत नाही.

हृदय पिळवटून टाकणारा हा अपघात पाहिल्यावर तुम्हाला हसू येईल. हे पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. एका यूजरने कमेंट केली- ही व्यक्ती जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे का?

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: