रामटेक – राजु कापसे
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे संस्थापक, लोक महर्षी महर्षी संविधान सभेची सदस्य आणि देशाचे पहिले कृषिमंत्री आदरणीय डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या रौप्य महोत्सव जयंतीच्या औचित्याने श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व विद्यासागर कला महाविद्यालय खैरी बिजेवाडा रामटेक आणि धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी विद्यासागर कला महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यासागर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के. यू. पिल्लई उपस्थित होते तर वक्ते म्हणून डॉ. राजेंद्र वाटाणे, तायवाडे कॉलेज, कोराडी हे होते. याप्रसंगी धनवटे नॅशनल कॉलेज चे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख, डॉ. आर. एन. गोसावी, मोहन पिंगळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उमराज देशमुख केले यांनी करून व्याख्यानाबाबत उपस्थितांना माहिती देऊन भूमिका मांडली. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त नवीन पिढीला त्यांच्या बाबतीत माहिती तसेच त्यांच्या कार्याची महती माहित होणे आवश्यक आहे.
विशेष व्याख्यानाचे वक्ते डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवन आणि कार्य यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. के. यू. पिल्लई यांनी समयोचीत अध्यक्षीय भाषण तसेच मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. रवींद्र पानतावणे यांनी केले.
संचालन डॉ. सतीश महल्ले यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक डॉ. सुरेश सोमकुवर, डॉ. सावन धर्मपुरीवार, प्रा. अनिल दाणी, डॉ. ज्योती कवठे, डॉ. आशीष ठाणेकर, डॉ. विलास जायभाये सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.