कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…
रामटेक – राजू कापसे
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रामटेक येथील मुख्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बुधवार, दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी आणि कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. विश्वविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन सहकारी यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी आपल्या संबोधनात म्हणाले, ‘‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरक राष्ट्रपुरुष आहेत. भारतीय राज्यघटना तर त्यांनी तयार केलीच परंतु संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी याचा आग्रहही धरला. स्वातंत्रय, समता, बंधुता व न्याय ही चार मूल्ये लोकशाहीचा पाया आहे याचा त्यांनी पुरस्कार तर केलाच परंतु भारतीय संस्कृती आणि राष्ट्र हे सर्वोपरी आहे.
याचीही जाणीव करून दिली. त्यांची अखंड ज्ञानसाधना, राष्ट्रप्रेम आणि भारताचे संविधान सर्वसमावेशक होण्यासाठी घेतलेले कष्ट हे चिरस्मरणीय राहतील. आपण सर्वांनीच त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेतली पाहिजे.’’
कार्यक्रमाचे आयोजन जनसंपर्क कक्षा तर्फे करण्यात आले होते. संचालन जनसंपर्क अधिकारी डाॅ. रेणुका बोकारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरविंद कुचनकर आणि नालंदा चौरे या कार्यालयीन सहका-यांनी सहकार्य केले.