महेंद्र गायकवाड
नांदेड
भारतीय राज्यघटनेने तृतीयपंथीय अर्थात किन्नरांना इतरांसारखेच समान अधिकार बहाल केलेले असून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजना राबविल्या असून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच 15 ऑगस्ट रोजी तृतीयपंथी सेजल हिला सेतू सुविधा केंद्र देण्यात आले.
सेजलने सेतू सुविधा केंद्र मिळविण्याचा आणी चालविण्याचा देशातील पहिली तृतीयपंथी म्हणून मान मिळवीला आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा दिशा पिंकी शेख यांनी सेजलला भारतीय संविधान देऊन तिचा सत्कार केला.या वेळी प्रदेश प्रवक्ते फारुक अहमद, वंचितचे नेते सुनिल सोनसळे, एमपीजेचे राज्य सचिव अल्ताफ हुसैन सर, कमल फाऊंडेशनचे अमरदिप गोधणे , युवा नेते महंमद कासीम, शुक्लोधन गायकवाड सह इतर मान्यवर उपस्थित होते.