बोईसर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे वृत्त घेण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही पोलिस अधीक्षक यांनी कारवाई केली नसल्याने या दडपशाही विरोधात पत्रकारांने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात ३० जुलै २०२३ रोजी एका अवैध केमिकल टॅकर केमिकल नाल्यात सोडत असल्याचे दिसल्यावर पत्रकार काशिफ अंसारी यांनी याबाबत बोईसर पोलिसांना तक्रार केल्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गवई व विनायक मर्दे हे याठिकाणी उपस्थित होते.
याच दरम्यान पत्रकार काशिफ अंसारी हे घटनास्थळी विडीओ चित्रीकरण करत असताना सहायक पोलिस निरीक्षक सतीश गवई व विनायक मर्दे यांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला व मारहाण करण्यात आली होती. याबाबत अनेक ठिकाणी तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.
बोईसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गवई व हवालदार विनायक मर्दे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करताच बोईसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तर आपल्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत खोटा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवला असल्याचा आरोप पत्रकार काशिफ अंसारी यांनी केला आहे.
पोलिसांनी पत्रकारांन सोबत असलेल्या विजय प्रसाद या मुलाचा जबरदस्तीने जबाब घेवून पोलिसांनी पत्रकारांना मारहाण केली नाही असा बनाव रचून तक्रारी अर्ज दप्तरी फाईल केले असल्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे. पत्रकारांना केलेल्या मारहाणीत दोषी पोलिसांन वर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे.
पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी व जिल्यातील इतर पत्रकार संघटनानी या उपोषणाला बसलेल्या पत्रकार एम. के. अंसारी यांना पाठींबा दर्शविला असून यावेळी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य हर्षद पाटील यांच्या सह जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.