Monday, December 23, 2024
Homeराजकीयदेगलूरमध्ये काँग्रेसला खिंडार: माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बळेगावकर, मिसाळे, नाईक,...

देगलूरमध्ये काँग्रेसला खिंडार: माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बळेगावकर, मिसाळे, नाईक, देशमुख आदींचा भाजप पक्ष प्रवेश…

नांदेड – महेंद्र गायकवाड

देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रितम देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती रामराव नाईक आदींसह देगलूर तालुक्यातील अनेक प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी माजी मु्ख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने देगलूर काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

सदर नेत्यांनी आज दुपारी नांदेड येथे पक्षप्रवेश केला. त्यांच्यासह युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभयसिंह देशमुख, ग्रेडर गंगारेड्डी कोटगिरे, उमेश पाटील हाळीकर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस दीपक शहाणे, भाऊसाहेब मरतेळीकर,अनंत पाटील खानापूरकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील आचेगावकर, प्रशांत पाटील भोकसखेडकर,

पप्पू रेड्डी मरखेलकर, खुशालराव पाटील अंबुलगेकर, योगेश पाटील नागराळकर, आनंद मेगापुरे आदींनीही खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी आदी नेते उपस्थित होते.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: