Wednesday, October 16, 2024
Homeराज्यनरखेड तालुक्याची तुतारी वैभव दळवी च्या हातात...

नरखेड तालुक्याची तुतारी वैभव दळवी च्या हातात…

लोकसभेच्या तोंडावर काटोल नरखेड मतदारसंघात राष्ट्रवादीत फेरबदल

युवा चेहर्याकडे पक्षात महत्त्वाची जबाबदारी…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटात लोकसभेच्या तोंडावर मोठे फेरबदल करण्यात आले आहे नरखेड तालुक्याची तुतारी थेट वैभव दळवी च्या हातात गेल्यां ने चांगल्या चांगल्याना घाम फुटला असुन वैभव दळवी यांनी पंचायत समिती उपसभापती काळात चांगलीच दमदार कामगिरी केल्याने तसेच ते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब व युवा नेते सलील देशमुख यांच्या विश्वासातले असल्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली अशी तालुक्यात चर्चा आहे.

पंचायत समितीत कमी कार्यकाळ मिळाला असला तरी कोरोनाच्या काळात व त्यानंतर त्यांच्या तालुका भर असलेला जनसंपर्क याच कार्याची दखल पक्षाने घेतली आणि थेट नरखेड तालुक्याची तुतारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली असून नरखेड शहर अध्यक्ष पदी संजय चरडे यांची नियुक्ति करण्यात आली तर कार्याअध्यक्षपदी अतुल पेठे,

मोवाड शहर अध्यक्ष पदी लक्ष्मीनारायण निमकर यांची नियुक्ति करण्यात आली तर नंदलाल मोवाडे यांची नागपुर ग्रामीण च्या उपाअध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आलेली असून माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या मान्यतेने लोकसभा निवडणुकिचा काळ लक्ष्यात घेता हा फेरबदल करण्यात आल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष प्रविण कुंटे पाटील यांनी दिली आहे तसेच नरखेड तालुक्यातील शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: