Congress-AAP : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पाच राज्यांसाठी युतीची घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत ‘आप’कडून संदीप पाठक, आतिशी आणि सौरभ भारद्वाज सहभागी झाले होते. मुकुल वासनिक, दीपक बावरिया आणि अरविंदर लवली हे काँग्रेसकडून होते.
काँग्रेस नेते मुकुल वासनिक म्हणाले की, आम आदमी पक्षासोबत दीर्घ चर्चा झाली, काँग्रेस आणि आपमध्ये जागांबाबत करार झाला आहे. आप दिल्लीत लोकसभेच्या 4 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामध्ये आप नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीत, तर काँग्रेस दिल्लीतील 3 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
गुजरातबद्दल बोलायचे झाले तर भरूच आणि भावनगर या दोन लोकसभा जागांवर आप निवडणूक लढवणार आहे. तर चंदीगड लोकसभा जागेवर काँग्रेस आणि गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेस लढणार आहे. मात्र, संपूर्ण पंजाबमध्ये एकत्र निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झालेली नाही.
कुठे आणि किती जागांवर चर्चा झाली?
दिल्लीत (७ जागा) काँग्रेस ३ तर आप ४ जागांवर लढणार आहे. गुजरातमध्ये (26 जागा), काँग्रेस 24 आणि आप 2 (भरूच आणि भावनगरमध्ये) लढणार आहेत. हरियाणात (10 जागा), काँग्रेस 9 आणि आप 1 (कुरुक्षेत्र) लढवणार आहे. काँग्रेस चंदीगडमध्ये एकाच जागेवर निवडणूक लढवणार आहे. गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.
इस चुनाव को AAP और Congress नहीं लड़ेगी, INDIA Alliance लड़ेगी, AAP कुछ सीटों पर और Congress कुछ पर।
— AAP (@AamAadmiParty) February 24, 2024
देश जिस परिस्थति से गुज़र रहा है, जिस तरह से
▪️चुनाव जीतने के लिए विपक्षी नेताओं को Jail में डाला जा रहा है।
▪️चुनावों की चोरी हो रही है।
▪️बेरोजगारी महंगाई चरम सीमा पर है।… pic.twitter.com/GsebxqEppn