Wednesday, July 24, 2024
spot_img
HomeBreaking NewsCongress-AAP | काँग्रेस-आपमध्ये युती…दिल्ली व गुजरातसह ५ राज्यांमध्ये आघाडीची घोषणा…

Congress-AAP | काँग्रेस-आपमध्ये युती…दिल्ली व गुजरातसह ५ राज्यांमध्ये आघाडीची घोषणा…

Congress-AAP : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पाच राज्यांसाठी युतीची घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत ‘आप’कडून संदीप पाठक, आतिशी आणि सौरभ भारद्वाज सहभागी झाले होते. मुकुल वासनिक, दीपक बावरिया आणि अरविंदर लवली हे काँग्रेसकडून होते.

काँग्रेस नेते मुकुल वासनिक म्हणाले की, आम आदमी पक्षासोबत दीर्घ चर्चा झाली, काँग्रेस आणि आपमध्ये जागांबाबत करार झाला आहे. आप दिल्लीत लोकसभेच्या 4 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामध्ये आप नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीत, तर काँग्रेस दिल्लीतील 3 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

गुजरातबद्दल बोलायचे झाले तर भरूच आणि भावनगर या दोन लोकसभा जागांवर आप निवडणूक लढवणार आहे. तर चंदीगड लोकसभा जागेवर काँग्रेस आणि गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेस लढणार आहे. मात्र, संपूर्ण पंजाबमध्ये एकत्र निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झालेली नाही.

कुठे आणि किती जागांवर चर्चा झाली?
दिल्लीत (७ जागा) काँग्रेस ३ तर आप ४ जागांवर लढणार आहे. गुजरातमध्ये (26 जागा), काँग्रेस 24 आणि आप 2 (भरूच आणि भावनगरमध्ये) लढणार आहेत. हरियाणात (10 जागा), काँग्रेस 9 आणि आप 1 (कुरुक्षेत्र) लढवणार आहे. काँग्रेस चंदीगडमध्ये एकाच जागेवर निवडणूक लढवणार आहे. गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: