सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने केला विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत…
मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
शहर प्रतिनिधीविद्यार्थीनींचा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मालेगांव च्या वतीने प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन नुकताच गौरव करण्यात आला.मालेगाव येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने 19 फेब्रुवारी 2024 रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.
या शोभायात्रेत मालेगाव शहरातील शेकडो नागरिकांसह शहरातील नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत लेझीम पथक तसेच विविध प्रकारचे छत्रपतींच्या जीवनावर आधारित क्षणचित्रे सादर केली होती. त्याचप्रमाणे मुलींनी सुद्धा नृत्यकला व पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली होती.
या विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन त्यांना एक प्रकारची मानवंदना दिली होती. त्यामध्ये मालेगाव येथील बाल शिवाजी विद्यानिकेतन तसेच बालविकास विद्यामंदीर प्राथमिक शाळा आणि हॅपी फेसेस इंग्लिश स्कूल या शाळेमधील विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते.
तसेच त्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सुद्धा त्यांची तयारी करून घेतली होती. त्या सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांचा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पुस्तक पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्यामध्ये बाल विकास मंदिर प्राथमिक शाळा बोरगाव रोड मालेगावचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे, लेझीम पथक प्रमुख मार्गदर्शक शिक्षक नंदकिशोर भुसारी, विठ्ठल कुटे, जिजेबा घुगे, अमोल बोडखे, संदीप कांबळे व सौ.ज्योती मोरे मॅडम, अनिल सरकटे, योगेश वाळूकर, गणेश इढोळे, गणेश शिंदे, सौ विजया भिसडे, कुमारी वंदना गवई, श्रीमती सुषमा देशमुख यांना गौरवण्यात आले.
तसेच हॅप्पी फेसेस शाळेच्या व्यवस्थापक श्रीमती ममता जोशी , मुख्याध्यापक गौरकर , शिक्षक संदीप काळबांडे , उमेश गायकवाड , सतीष चव्हान , पवन घुगे , शंकर गोटे , विठ्ठल मोहळे , बाळु राऊत , आदित्य तोंडे , सुंदर डोंगर दिवे , सेवाराम चव्हान , सौ संगीता वानखेडे , प्रज्ञा बोरकर , रेणुका मराठे , मिस नम्रता , साक्षी गोरे , साक्षी बेलोकार , राखी गट्टाणी , वंदना ताकतोडे , देवानंद वैद्य यांना तसेच बाल शिवाजी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख,
शिक्षक पुनम रमेशराव रहाटे, राजे यशवंत पोघे, जगदीश देवकर, नितीन घुगे, भाग्यशाली खोटे, जयश्री सरकटे, किसन काकडे, शरद भालेराव, संदीप आखरे, सिद्धार्थ खिल्लारे, स्वाती खिल्लारे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे वसंतराव अवचार , प्रा भरत आव्हाळे , अनिल गवळी , तेजराव जाधव , बळीराम घोडमोडे आदींची उपस्थिती होती.