Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeराज्यज्यास्तीत ज्यास्त नागरीकांनी मतदान करा - एसडीओ सवरंगपते...

ज्यास्तीत ज्यास्त नागरीकांनी मतदान करा – एसडीओ सवरंगपते…

  • तक्रारीसाठी कंट्रोल रूमचीही व्यवस्था
  • रामटेक विधानसभा क्षेत्रात २०७४८२० मतदार

रामटेक – राजु कापसे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दि. १७ मार्च ला स्थानिक एसडीओ कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचार संहीतेबाबद विविध नियम, अटी, शर्ती तथा मार्गदर्शन एसडीओ वंदना सवरंगपते यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

एसडीओ वंदना सवरंगपते यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या १९ एप्रील ला आगामी लोकसभा निवडणुक होवु घातली असुन आचार संहिता लागु झालेली आहे. रामटेक विधानसभा क्षेत्राची एकुण मतदार संख्या २०७४८२० एवढी असुन ३५६ बुथ ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तब्बल दोन हजार अधिकारी – कर्मचारी मतदान प्रक्रियेकामी उपस्थित राहाणार आहे. मतदान प्रक्रियेत विशेष बाब अशी की ८५ वर्षांच्या वरील वयोवृद्धांना तथा दिव्यांगांना घरपोच मतदानाची सुविधा करण्यात आली आहे. त्यामध्ये ज़्या मतदारांना मतदान कक्षापर्यंत येणे शक्य होत नसेल अशा मतदारांना ट्वेल्डी फॉर्म भरून घरपोच मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फ्लाईंग स्कॉड सुद्धा तैनात राहाणार आहे.

तसेच तक्रारीसाठी कंट्रोल रूम ची व्यवस्था करण्यात आली असुन गैरप्रकार घडल्यास त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील श्रीराम विद्यालयात महिला कार्यान्वीत बुथ ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तक्रारीसाठी ०७११४२९५७६५ या क्रमांकावर संपर्क साधन्याचे तथा ज्यास्तीत ज्यास्त नागरीकांनी मतदान करावे असे आवाहन एसडीओ वंदना सवरंगपते यांनी पत्रकार परिषदेत केलेले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: