अकोला – गेल्या चार दिवसाआधी विधानपरीषद आमदार अमेोल मिटकरी यांनी शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच अकोलाचे अंकुश गावंडे यांना ५० लक्ष रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे त्या नोटीसनुसार दाव्याची रक्कम जमा करण्यासाठी राज्यभर शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच चे कार्यकर्ते भीख मांगो आंदोलन करणार असल्याची माहिती आज अकोल्यात अंकुश गावंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली
गेल्या १६ वर्षापासून फुले शाहू आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रात पेरनारे आमदार अमोल मिटकरी भारतीय जनता पाटीच्या कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे आढळले त्यामूळे गेल्या १० वर्षापासुन त्यांच्या विचारांचा सन्मान करनारे शिव, फुले,शाहू,आंबेडकर विचार मानणाऱ्या अनुयायांचे मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे त्यामूळे शिव फुले शाहू आंबेडकरविचार पेरणारे आमदार अमोल मिटकरी १६ मिनिटात आपले विचार कसे काय बदलवतात यावर चिंतन केले असता त्यांची तब्येत बिघडली असावी.
असे समजून त्यांना वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी अंकुश गावंडे यांनी डॉ तिरुख यांच्या हॉस्पिटल मध्ये. नोंदणी केली होती त्यावर चींडून आमदार अमोल मिटकरी यांनी अंकुश गावंडे यांना ५० लक्ष रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे ती नोटीस बजावण्यात आल्यानंतर ज्याप्रमाणे आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एक एक रुपया जमा करून त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
त्याचप्रमाणे पुन्हा एकदा एक एक रुपया जमा करण्यासाठी राज्यभर भिखं मांगो आंदोलन करणार असल्याचे आज अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन अंकुश गावंडे यांनी संगितले अमोल मिटकरी हे माध्यमांवर जेव्हा बोलतात तेव्हा ते शिव फुले शाहू आंबेडकर सांगतात आणि आज ते पाळीव मांजरा सारखे बोलतांना दिसले त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांच्य मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की या जिल्हयात गाव तिथे ग्रंथालय असा हेतु असाणारा आमदार अस कस काय बोलू शकतो ?
जाणीव पूर्वक ५० खोके एकदम ओके हा नारा देणारा आमचा आमदार गुवाहाटीमध्ये जाणान्या आामदारांबाबतीत माध्यमावर बोलतांना त्या आमदारांना आर. एस. एस. ने खाण्यामध्ये काही तरी दिलं असावं असा उल्लेख आमदार अमोल मिटकरी जेव्हा करतात त्याच वेळी मनात शंका येवून आमदार असे करू शकत नाही त्यांच्या खाण्यामध्ये कोणी आर. एस. एस. ने दिलं असावं अस वाटल म्हणुन त्यांच्यावर मानसिक उपचार व्हावा म्हणून डॉ.नविन तिरूख यांच्या दवाखान्यामध्ये नबर लावला त्याचे कारण ते मोठे झाले.
फुलें शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार विकुन त्यांना आंबेकरी चळवळीने व इथल्या मराठा सेवा संघाने मोठे केले, आणि ते आज संविधान विसरतांना दिसले व त्यांनी क्षणातच विचार विकले, म्हणून त्यांना ज्यांनी एक-एक रूपया व्गेणी जमा करून एक चळवळ उभी करण्याची संधी दिली त्यांनाच एक-एक रूपया भिख मागून रक्कम जमा करून त्यांचा उपचार करायाच ठरविलं होतं.
याची माध्यमांवर मोठी बातमी झाली हे सगळ होत असतांना प्रामाणीक हेतू होता की,दादाचा उपचार प्रामाणीकतेने करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच दादाने ५० लक्ष रूपये इतका मानहानीचा दावा ठोठविला. आता त्याच दादांना आंबेडकरी चळवळीतील लोक, मराठा महासेवा संघ, संभाजी बिग्रेड व इतर यांना आवाहन करू इच्छतो की, ५० लक्ष रूपये भरू शकत नाही.
त्यामूळे सर्वानी मिकुन एक-एक रूपया जमा करून अमोल मिटकरी यांना ५० लक्ष रूपये देवून या राज्य व्यापी भिक मांगो आंदोलनात सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन आज अंकुश अनिल गावंडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.