Sunday, December 22, 2024
Homeखेळदेवग्राम येथे अमोई क्रीडा महोत्सवाचा समारोप सोहळा...

देवग्राम येथे अमोई क्रीडा महोत्सवाचा समारोप सोहळा…

नरखेड – अतुल दंढारे

अंत्योदय मिशन,देवग्राम या संस्थेच्या वतीने जीवन विकास विद्यालयात अमोई क्रीडा महोत्सवाचा समारोप सोहळा देवग्राम येथे पडला पार अमोई क्रीडा महोत्सव तीन दिवस म्हणजे 13,14 आणि 16 जानेवारी 2023 पर्यंत आयोजित केलेला होता.आयोजनाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचा खेळाच्या माध्यमातून शारीरिक विकास व्हावा आणि त्यांचे आरोग्य निरोगी, सुदृढ, निकोप आणि निरामय रहावे आणि उत्तम खेळाडू तयार व्हावा तसेच चारित्र्यवान विधार्थी घडावा हा उद्देश समोर ठेऊन विध्यार्थ्यांना क्रीडांगण उपलब्ध करून दिल्या जाते.

या क्रीडा महोत्सवात मैदानी खेळ, सांघिक खेळ म्हणून कबड्डी, खो खो ,व्हॉलीबॉल, लंगडी ,बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळाडू खेळतात. या क्रीडा महोत्सवात C.B .S.E. पासून ते Post Graduate पर्यंतच्या विधार्थांचा खेळामध्ये सहभाग होता. या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जीवन विकास महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. देवेंद्र भोंगाडे होते.

अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शरीर हीच खरी संपत्ती आहे, म्हणून सर्वच विधार्थांनी आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगा ,प्राणायाम आणि क्रीडांगणावर जाऊन खेळ खेळले पाहिजे जेणेकरून आपले आयुष्य वाढेल, असे मोलाचे मार्गदर्शन आणि विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. योगेश सरोदे, ITI चे प्राचार्य श्री ठाकरे सर, पूजा बोन्द्रे ,जीवन विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रविकांत बाविस्कर, डॉ. राजू श्रीरामे,

डॉ. प्रवीण घारपुरे,डॉ. मंगेश आचार्य,प्राध्यापक नागेश ढोबळे, , श्री दिनेश पांगुळ,इंगोले मॅडम, डॉ. कल्याणी ठाकरे, श्री बोबडे सर, श्री शेख सर, अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रमुख श्री मंगेश निंबुरकर , श्रीमती सुषमा बढिये,श्री योगेश दंढारे, श्री मदन ढोले, श्री मनोहर कामडे, श्री प्रमोद बैस, श्री संदीप फुके, श्री राहुल कोरडे, श्री चेतन पाल नरेंद्र बालपांडे ,सर्वच प्राध्यापक वृंद ,शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार मोलाचे योगदान आणि सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन विकास प्राथमिक शाळेचे कराटे शिक्षक श्री नरेंद्र बिहार यांनी केले आभारप्रदर्शन अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रमुख श्री मंगेश निंबुरकर यांनी केले. खेळीमेळीच्या वातावरणात क्रीडा स्पर्धेचा समारोपीय सोहळा पार पडला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: