Thursday, July 18, 2024
spot_img
Homeराज्यपार्क साईट येथील आनंद गड नाका ते साने गुरुजी चौक फुटपाथ वरील...

पार्क साईट येथील आनंद गड नाका ते साने गुरुजी चौक फुटपाथ वरील नाल्यावर अतिक्रमण केल्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण कमी करून केले जात आहे नाले…

भविष्यात जर आग लागली बचाव कार्यासाठी अग्निशमक दल गाडी किंवा ॲम्बुलन्स येऊ शकणार नाही

धीरज घोलप

पार्कसाईट येथे आनंद गड नाका ते वर्षा नगर येथे महापालिका फंडातून आरसीसी रोडचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी फुटपाथ वरील नाले बनवण्याचे काम सुरू आहे. हा रोड ६० फुटाचा असल्यामुळे स्थानिक दुकानदाराने अतिक्रमण करून सर्व दुकाने बाहेर काढली आहेत. त्यामुळे सर्व दुकानेही नाल्यावरती आहेत.

आता हा रोड २० ते १५ फुटाचा झाला आहे. मात्र मनपाचे कंत्राटी कामगार फुटपाथ वरील नाले न बनवता रस्त्याचा काही भाग तोडून तेथे नाले बनवण्याचे काम चालू आहे. त्याच्यामुळे रस्त्याची रुंदीकरण अजूनही कमी झालेली आहे.

भविष्यात जर या विभागात मोठी दुर्घटना घडली किंवा मोठी आग लागली येथे साधी अग्निशामक दलाची गाडी किंवा ॲम्बुलन्स ची गाडी सुद्धा येऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावरील काही भागावर जो नाला बनवला जात आहे त्याला विरोध दर्शवलेला आहे आणि भविष्याची चिंता ही व्यक्त केलेली आहे.

Dhiraj Gholap
Dhiraj Gholaphttp://mahavoicenews.com
मी पत्रकार धीरज घोलप, विक्रोळी-मुंबई येथे गेल्या १५ वर्षापासून पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहे. महाव्हॉइस या लोकप्रिय वाहिनी मध्ये गेल्या ५ वर्षापासून मुंबईसारख्या शहरांमध्ये सक्रिय पत्रकारीता करीत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: