Saturday, July 27, 2024
spot_img
Homeराज्यसमाजप्रबोधन करुण स्वच्छता, शिक्षण व चारित्र यांची समाजाला निष्काम कर्मयोगी श्री संत...

समाजप्रबोधन करुण स्वच्छता, शिक्षण व चारित्र यांची समाजाला निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांनी शिकवण दिली : माजी आमदार राजेंद्रजी जैन…

सूर्याटोला (गोंदिया) येथे निष्काम कर्मयोगी महान संत श्री गाडगे महाराज यांची पावन पुण्यतिथी साजरी…

गोंदिया : राजेशकुमार तायवाडे

(गोंदिया) श्री संत गाडगे महाराज तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीने गाडगे नगर, सूर्याटोला, गोंदिया येथे निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांची ६७ वी पुण्यतिथी महोत्सव निमित्त ह.भ.प. चुन्नीलाल घोडमारे महाराज यांच्या अमृत वाणीतून किर्तन व गोपालकाल्याचा लाभ माजी आमदार राजेंद्रजी जैन यांनी घेतला व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नमन केले.

यावेळी राजेंद्र जैन म्हणाले की, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असे गायन करीत स्वच्छतेच्या माध्यमातून गावची घाण आणि अस्वच्छता साफ करून आपल्या प्रभावी किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अनिष्ठ विचार, रुढी, अंधश्रद्धा यावर समाजप्रबोधन करून स्वच्छता, शिक्षण, चारित्र्य यांची समाजाला निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांनी शिकवण दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीवर दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. श्री संत गाडगे तथा तुकडोजी महाराज विश्वस्त मंडळाचे प्रथम अध्यक्ष समाजसेवी स्व.मनोहरभाई पटेल यांनी याची पायाभरणी केली, हरिहरभाई पटेल व सहयोगी यांच्या मार्गदर्शनात या मंडळाची वाटचाल सुरु आहे.

या क्षेत्राच्या विकासासाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार, या पवित्र भूमीवर किर्तन व गोपालकाल्याचा लाभ मिळाला हे माझे सौभाग्य समजतो. यावेळी जैन यांनी सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या

यावेळी राजेंद्र जैन, उदयकुमार प्रमर, हरिनारायण चौरसिया, विजयसिह बैस, नागो बन्सोड, सुनील पटले, सोहनलाल गौतम, मुलचंद रहांगडाले, मुकेश चन्ने, केवलचंद गौतम, कमल बोरकर, किसान वडीवे, भूमेश्वर गुठीकर, मंगेश रंगारी, श्रेयश खोब्रागडे, अमन घोडीचोर, शुभम कोल्हटकर,

धनलाल रहांगडाले, दिलीप लांजेवार, शैलेंद्र चंदेल, जितेंद्र चौधरी, योगिता शेंडे, शोभा यादव, कुंदाताई खरकाटे, त्रिवेणी तावाडे, शशांक खापेकर, माधोराव रहांगडाले सहित मोठ्या संख्येने समस्त सदस्यगण, भाविक, सहयोगी मित्र मंडळ उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: