Tuesday, September 17, 2024
Homeराज्यराष्ट्रपतींच्या हस्ते आ.ॲड.आशिष जयस्वाल यांना मिळालेल्या पुरस्काराचा नागरिकांनी केला आनंदोत्सव...

राष्ट्रपतींच्या हस्ते आ.ॲड.आशिष जयस्वाल यांना मिळालेल्या पुरस्काराचा नागरिकांनी केला आनंदोत्सव…

आमदार जयस्वाल यांचा भव्य नागरी सत्कार

रामटेक – राजु कापसे

विधानभवनात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल आ. ॲड.आशिष जयस्वाल यांना उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार देवून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आल्याने नागरिकांनी या सन्मानाचा आनंदोत्सव साजरा करून त्यांचा भव्य नागरी सत्कार केला आहे.

रामटेक मतदार संघाचे सलग चौथ्यांदा आमदार झालेल्या आशिष जयस्वाल यांनी मतदार संघाचा विकासाचा ध्यास घेत विकास कामे करून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलुन टाकला याकरिता सर्वात जास्त निधी मिळविण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला.तसेच जनतेच्या समस्या सभागृहात मांडून त्या सोडविण्यासाठी विशेष कार्य केले.

त्यांच्या कार्याची दखल घेवुन राज्य शासनाच्या वतीने सन२०२०-२०२१या वर्षीचा उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार त्यांना जाहीर करून मुंबई येथे भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.त्याबद्दल मतदार संघातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

जयस्वाल यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.जयस्वाल हे मुंबईवरून पुरस्कार स्वीकारून मतदार संघात दाखल होताच नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले,माता भगिनींनी औक्षण केले.

तर शहरातील सुपर मार्केटच्या मैदानात भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात रामटेक विधानसभा मतदारसंघातील असंख्य् महिला ,नागरिक, गणेश मंडळे, सामाजिक संघटना, ऑटो संघटना, बार कौन्सिल ,ग्राम पंचायत संघटना,नगर परिषद प्रशासन,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व्यापारी संघटना,पत्रकार संघटना,विविध संस्था यांच्यावतीने स्वागत करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. जयस्वाल यांना पुरस्कार मिळाल्याचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात नागरिकांनी साजरा केला.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: