Thursday, September 12, 2024
spot_img
Homeराज्यपंचायत समिती रामटेक दोन पुरस्काराने सन्मानित...

पंचायत समिती रामटेक दोन पुरस्काराने सन्मानित…

घरकुल योजनेत ठरले रामटेक तृतीय.

रामटेक – राजु कापसे

ग्राम विकास व पंचायत राज विभागीय आयुक्त कार्यालय विभाग नागपूर तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महा आवास अभियानाअंतर्गत राज्यपुरस्कृत ग्रामीण आवास योजना विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून पंचायत समिती रामटेकला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

पंचायत समिती रामटेक येथील गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांचा विकास करण्याच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले.त्यांच्याच या कार्याला अखेर यश आले आहे.

पंचायत समिती रामटेक अंतर्गत घरकुल योजना उत्तमरित्या पार पाडल्याने जास्त घरकुल कामे पूर्ण केल्याबद्दल तृतीय क्रमांक प्राप्त केला.त्याबद्दल विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे सत्कार करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी,जिल्हा प्रकल्प संचालक वर्षा गौरकर,विभागीय आयुक्त बिदरी यांच्याहस्ते गटविकास अधिकारी जयसिंग जाधव,सभापती चंद्रकांत कोडवते,पंचायत विस्तार अधिकारी सुभाष सानप यांनी तृतीय बक्षीस स्वीकारले.

तर पंचायत समिती रामटेक कार्यालयात ग्रामसेवक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी व सभापती यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष लीलाधर सोनवाणे,चिंतामण बेलेकर,पंडित देवकर,धनराज पाटील,प्रवीण लव्हाळे यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: