अकोला – संतोषकुमार गवई
आरक्षणाचा हक्क मिळवून देत सामाजिक न्यायाची शिकवण देत क्रांती करणारे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे जीवन व कार्य प्रत्येकाला प्रेरणा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोळकर यांनी व्यक्त केले. ते सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात बोलत होते यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त एम.डब्ल्यू मून,समाज कल्याण विभागाचे सुसतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज पुढे बोलताना म्हणाले की शाहू,फुले आंबेडकरांचा विचार आज जागतिक पातळीवर पोहोचला आहे.सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू राजांनी केलेले प्रयत्न सामाजिक क्रांतीचा हुंकार होता. कार्यक्रमात अमलीपदार्थ विरोधी दिवसानिम्मित व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली. यावेळी श्रीमती पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी समतादूत यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.