सांगली – ज्योती मोरे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली कडून चेन स्नॅचिंग करणाऱ्या दीपक नागेश कुंभार राहणार कुंभार गल्ली कोरेगाव यास फाळकेवाडी फाट्यावरून अटक केली आहे त्याच्याजवळून 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत तपास सुरू असताना खास बातमीदारांना दीपक नागेश कुंभार राहणार कुंभार गल्ली कोरेगाव तालुका वाळवा हा चोरीचे दागिने घेऊन नागाव मार्गे आष्ट्याकडे जाणार असल्याची माहिती दिल्यानुसार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी जबरी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने फाळकेवाडी फाट्यावर सापळा रचून त्याच ताब्यात घेतलंय.
त्याची अंग झडती घेतली असता पॅन्टच्या खिशात प्लास्टिक पिशवीत मोहनमाळ मिळून आली. सदर दागीन्याबाबत चौकशी केली असता, आठवड्यापूर्वी वाळवा तालुक्यातील बहे मधून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून पत्ता विचारण्याच्या पाहण्यानं हिसडा मारून चोरल्याचं त्यांनं सांगितलं.
सदर प्रकरणाबाबत इस्लामपूर पोलिसात खात्री करून त्याच्या कब्जातील सोन्याची 60 हजार रुपये किमतीची मोहन माळ आणि दहा हजार रुपये किमतीची 4s चॅम्पियन ही बजाज कंपनीची मोटरसायकल असा एकूण 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपीसह मुद्देमाल इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करतंय.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील, सचिन धोत्रे, कुबेर खोत, पोलीस नाईक सुरेश थोरात,प्रकाश पाटील, पोलीस शिपाई विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर आदींनी केलीय.