Friday, July 19, 2024
spot_img
Homeराज्यअमरावती जिल्ह्यात रात्री घरफोडी करणारे अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात...

अमरावती जिल्ह्यात रात्री घरफोडी करणारे अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अमरावती जिल्ह्यात रात्री घरफोडी करून हैदोस घालणाऱ्या दोन चोरट्यांना अमरावतीच्या ग्रामीण स्थानिक पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. तेजस संजय दरेकर वय २० वर्ष व रोशन किरण सरदार वय २६ वर्ष दोन्ही रा. रवीनगर,परतवाडा असे पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून जप्त केलेल्या मुददेमालासह पोलीस पोलीस स्टेशन दर्यापुर यांचे ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या महिनुसार, पोलीस अधीक्षक सा. अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील वाढत्या घरफोडीचे घटनांना आळा बसावा या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व पथकाला घरफोडीचे गुन्हे उघडकीस आनण्याबाबत सुचना निर्गमित केल्या होत्या. त्या अनुषंघाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक पो.स्टे दर्यापुर अप क्रमांक ३८९ / २०२३ कलम ४५७.३८० भादवीच्या गुन्हाचा समांतर तपास करीत असताना गुप्तबातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून तसेच तांत्रीक माहितीचे आधारावर १) तेजस संजय दरेकर वय २० वर्ष २) रोषन किरण सरदार वय २६ वर्ष दोन्ही रा. रवीनगर,परतवाडा यांना अमरावती शहर येथुन ताब्यात घेवून त्यांचे जवळ असलेल्या कॉलेज बॅगची पाहनी केली असता त्यामध्ये दोन वेगवेगळे हॅन्ड ग्लोज, दोन लोखंडी टॉमी, एक मोठा स्कुड्रावर एक लहान स्कुड्रावर, एक लोखंडी चेन पाना, एक सात स्कुड्रावर असलेला सट असे चोरी करण्यासाठी वापरण्यात येनारे साहित्य मिळुन आले.

तसेच सदर कॉलेज बॅगमध्ये मोबाईल साहित्य १) चार्जर कनेक्टर डाटा केबल पाकीट एकुन ५२ नग २) तिन हेडफोन पाकीट ३) ओप्पो कंपनीचे चार्जर बॉक्स एकुन ५ नग ४) एम. आय कंपनीचे चार्जर बॉक्स एकुन २ नग ५) के पावर कंपनीचे चार्जर एकुन १ नग (५) एक ब्ल्यूटुथ हेडफोन ६) एक रिअलमी नारझो कंनपीचा निळया रंगाचा मोबाईल असे साहित्य मिळुन आल्याने सदरचे साहित्याबाबत दोन्ही आरोपीतांना विचारपुस केली असता त्यांनी सदरचे साहित्य अमरावती नागपुर हायवे रोडवरील एका मोबाईल शॉपीतुन रात्रीदरम्यान चोरी करून आनल्याचे सांगीतले.

त्यांना पोलीस स्टेशन दर्यापुर येथिल घरफोडीच्या गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पुन्हा विश्वासात घेवून सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, अंदाजे तिन महिण्यापुर्वी आम्ही दर्यापुर शहरातील एका कॉलनिमध्ये जावून बंद घराचे कुलूप सोबत असलेल्या लोखंडी टॉमीने तोडुन घरात आत प्रवेश करून लोखंडी कपाटातील नगदी २०,०००/-रू चोरून नेले होते अशी गुन्हयाची कबुली दिली.

त्यांनी अधिक विचारपुस केली असता त्यांनी पो स्टे दर्यापुर, अचलपुर, खोलापुर, तिवसा, लोणी, दत्तापुर या ठिकाणी चो-या केल्याची कबुली दिल्याने त्यांचे कडून पोलीस स्टेशन अभिलेखावरील १) पो.स्टे दर्यापुर अप क्रमांक ३८९/२३ कलम ४५७,३८० भा.द.वि २) पोस्टे खोलापुर अप क्रमांक १५४ / २०२३ कलम ४६१, ३८० भादवी ३) पो.स्टे दर्यापुर अप क्रमांक ३८७ / २०२२ कलम ४५७,३८० भादवी ४) पोलीस स्टेशन लोणी अप क्रमांक ११४ / २२ कलम ३८० भादवी ५) पोलीस स्टेशन अचलपुर अप क्रमांक १८३/२२ कलम ४५४, ४५७,३८० भादवी ६) पो. स्टे तिवसा अप क्रमांक ४८४ / २२ कलम ४५४,३८० भादवी ७) पो.स्टे दत्तापुर अप क्रमांक ३८७/२३ कलम ४५७,३८० भादवी प्रमाणे एकुन ७ गुन्हे उघडकीस आले असुन एकून १,६३,००० /- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी जप्त मुददेमालासह पोलीस पोलीस स्टेशन दर्यापुर यांचे ताब्यात देण्यात आले. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक, शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा अम ग्रा येथील पोउपनि संजय शिंदे, अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सैययद अजमत सुधिर बावने, निलेश डांगोरे, अमोल केन्द्रे, सागर धापड, चालक संजय गेठे यांनी केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: