पातूर – निशांत गवई
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु परिसरात मागील चार ते पाच महिन्यात जवळपास १० ते १२ जनावरे चोरी गेल्याची घटनेन शेतकऱ्यामध्ये व पशुपालकमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.काही शेतकऱ्यांनी तर चान्नी पोलिसांमध्ये तक्रार देऊन सुद्धा या कडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकरी व पशुपालक वर्गातून केल्या जात आहे.
दिग्रस बु परिसरात ५ जून च्या मध्यरात्री ला बाळू इंगळे च्या दोन गायी व गाजनान गवई यांची एक गाय चोरी गेली असून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.यामुळे यांनी तत्काळ चान्नी येथे तक्रार देण्यात आली परंतु पोलिसांनी फक्त घटनास्थळी भेट देऊन बघू म्हणून पोलीस निघून गेल्याचे सांगण्यात आले.
यक अगोदर सुद्धा अशाच गायी चोरी गेल्याचे शेतकरी सांगत असून या मध्ये सुखदेव शेंगोकार १बैल, रमेश बराटे एक गाय, शिवा धोत्रे २ म्हशी, राजकुमार चिकटे एक गाय, दलू पाटील एक गाय, अनंता ताले एक गाय,आदी गावातून सुद्धा जनावरे चोरी गेल्याने शेतकऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या तक्रारी नुसार त्याची ओसी द्यायला पाहिजे परंतु त्याची झेरॉक्स प्रत सुद्धा दिल्या जात नसल्याचा आरोप शेतकरी वर्गातून करण्यात आली.
आपल्या गावात जनावरे मागील पाच ते सहा महिन्यात चोरी गेल्याची घटना घडली असून या कडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.या गँभिर प्रकारकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लक्ष चोरी गेलेल्या जनावरांचा शोध घेऊन आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी.जेणेकरून शेतकरी चिंतामुक्त व आर्थिक नुकसान सामोरे जावे लागनार नाहीं. बाळू इंगळे पशुपालक दिग्रस बु.