Friday, July 19, 2024
spot_img
HomeBreaking Newsमूर्तिजापूर | ३० वर्षीय महीलेची गळफास घेवून आत्महत्या!...

मूर्तिजापूर | ३० वर्षीय महीलेची गळफास घेवून आत्महत्या!…

वार्ताहर —- अर्जुन पुंडलिक बलखंडे (महाव्हॉईस न्यूज, मुर्तिजापूर)
दिनांक 09/06/2024

मुर्तिजापूर : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोनाला परसोडा रोड स्थित उमेश भगत यांच्या शेतातील वीट भट्टीवर काम करणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सौ. रेवती विक्रम राठोड वय अंदाजे 30 वर्षे राहणार दहातोंडा(ता. मुर्तिजापूर) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून ती भगत यांच्या वीट भट्टीवर मजुरीचे काम करायची. घटनेची माहिती होताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्या ठिकाणाचा पंचनामा केला.

मिळालेल्या माहितीनुसार,सदर महिलेचा लंकेश राऊत नामक व्यक्तीशी विवाह झालेला होता,त्यातून त्यांना एक जवळपास 4 वर्षाचा मुलगा आहे.परंतु त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही व ती आपल्या आईकडे नागपूरला निघून आली तिथे तिचा संबंध विक्रम राठोड व्यक्तीशी आला व दोघांनी प्रेमविवाह केला. नागपूर वरून ती व विक्रम राठोड यांच्या घरी दहतोंडा येथे राहायला आली त्या दरम्यान सोनाला रोड वरील उमेश भगत यांच्या विट भट्टीवर काम करून दोघेही उदरनिर्वाह करत होते. एके दिवशी तिने आपल्या मुलाला आणण्यास सांगितले व तो सुद्धा त्यांच्या सोबत राहू लागला. सदर महिला हि मद्य प्राशन करून मरण्याची भाषा बोलायची .

अशीच काल सायंकाळी मद्य प्राशन केले व आतून दार लाऊन घेतले.विक्रम राठोड तिचा पती घरी आला तेव्हा दार उघडण्यासाठी वाजवले असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्याने खिडकीतून पाहिले असता सदर महिला हि गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तेव्हा त्याने टीकासाच्या साहाय्याने दाराची कडी उघडली.तिला खाली काढताच तिथेच तिची प्राणज्योत मावळली . काल तिचे मृत शरीर संध्याकाळी शव– विचछेदनासाठी मुर्तिजापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले . काल रात्री उशिरापर्यंत मुर्तिजापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद व्ह्याची होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: