पावती होती म्हणून ४२ हजार रु. भरण्यापासून ग्राहक बचावले
मौदा (ताप्र) : अंधारात राहू नये म्हणून कापलेली विज जोडण्यासाठी गळ्यातील सोन्याची चैन विकून थकीत ४२ हजार रुपये वीजबिल भरूनही तब्बल आठ वर्षांनी महावितरण कंपनीने आपल्यावर थकीत असलेले ४१ हजार नऊशे ४६ रुपये (४१९४६/-) विजबील भरा अशा आशयाचे नोटीस वीज ग्राहकाला शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी लाईन मेन मार्फत मिळाली. नोटीस वाचून ग्राहकाला धक्काच बसला.
मौदा तालुक्यातील राहाडी येथील ग्राहक किसना दशरथ पवार ग्राहक क्रमांक ४२२४५००५६७६८ हा आहे. यांनी आर्थिक बिकट परिस्थितीमुळे विद्युत पुरवठा थकबाकी रक्कम न भरल्यामुळे दि.२६ सप्टेंबर २०१४ रोजी कायमस्वरूपी वीज खंडित करण्यात आली. थकीत बिल ४२ हजार पन्नास रुपये माझ्यासाठी जास्त आहे, थोडेफार कमी करून द्या साहेब अशी सारखी विनवणी तत्कालीन सहाय्यक अभियंता कोठे यांच्याकडे विनवणी केली परंतु त्यांनी ऐकले नाही व शेवटी नाईलाजाने ग्राहक किसना पवार यांनी गळ्यातील सोन्याची चैन विकून दि. १८ एप्रिल २०१६ रोजी (४२०५०/-) थकीत विज बिल भरून कापलेली वीजपुरवठा सुरू केले. दरम्यान किसना पवार यांचा १५ जानेवारी २०२१ रोजी मृत्यू झाला आहे.
थकीतील विज बिल भरल्याचा रेकॉर्डला नोंद नाही
महावितरण कंपनी चे तत्कालीन सहाय्यक अभियंता कोठे यांच्या निष्काळजीपणामुळे ग्राहक किसना पवार यांनी भरलेल्या थकीत विजबीलाची रेकार्डला (सिस्टीम ला) नोंद नसल्याने तब्बल आठ वर्षांनंतर आपल्यावर (४१९४६/-) एवढी थकबाकी असल्याचे नोटीस शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी लाईनमन मार्फत मृतक किसना पवार यांचा मुलगा प्रशांत पवार यांना मिळाली. थकित वीज बिलाची नोटीस पाहून प्रशांत पवार यांच्या पायाखालची जमीन सरकली. व भरलेल्या थकीत वीज बिलाची पावती घरभर हुडकून शोधून काढली. नोटीस घेऊन विज वितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता अभिजित भोयर यांना पावती न दाखविता नोटीस दाखविले असता त्यांनी सिस्टीम मध्ये पाहून कुठेच भरल्याची नोंद नाही त्यामुळे ही रक्कम आपल्याला भरावेच लागेल असे सांगितले. नंतर भरल्याची पावती दाखविल्यावर शांत झाले आणि एक अर्ज देऊन टाका होऊन जाईल अशी समजूत काढली. महत्वाचे म्हणजे पावती सापडली नसती तर गरिबांवर अधिकिचा भुर्दंड सोसावा लागला असता.
आज या ग्राहकांकडे थकीत विजबील भरल्याची पावती नसती तर नमूद रक्कम भरावीच लागली असती. त्यासाठी प्रिय ग्राहकांनो आर्थिक देवाणघेवाण, आर्थिक व्यवहार, आर्थिक तडजोड करतांना त्यासंबंधी बील, पावत्या वर्षानुवर्षे जपून ठेवा.
तुकाराम एस. लुटे,
संघटनमंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत, मौदा तथा
प्रसिद्धी प्रमुख, अ.भा. ग्राहक पंचायत, विदर्भ प्रांत
आम्ही अधिकारी, कर्मचारी आज येथे आहोत, उद्या नसून पण ग्राहक हा कायम स्वरुपी असतो. अशा काही थकीत वीज बिल भरले असल्यास अशावेळी एकदा तरी ग्राहकांनी कार्यालयात जाऊन सिस्टीम (रेकॉर्ड) मध्ये नोंद झाली की नाही याची झाल्याची खात्री करून घ्यावी.
अभिजित भोयर,
सहाय्यक अभियंता, महावितरण कंपनी, मौदा