सांगली – ज्योती मोरे
सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणा-या आणि प्रसिद्धीपासून लांब राहून सदैव प्रगतीपथावर राहणा-या महिलांचा शोध घेऊन मा. श्री.प्रवीणशेठ लुंकड यांच्या मातोश्री कै.बबीबाई लुंकड यांच्या पुण्यतिथीनिमित्त ७ जानेवारी २०२४ रोजी समाजभूषण पुरस्कार सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा सुरज फौंडेशन संस्थेचा मानस आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये २५०००/-, सन्मानपत्र व मानचिन्ह या स्वरूपाचे राहील.
निकष :- १) पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीने कमीत कमी ५ वर्षे कार्य करणे अपेक्षित आहे.
२) कार्यकक्षेत काम करत असताना त्या व्यक्तीची स्वतःची आर्थिक व
मानसिक गुंतवणूक असणे गरजेचे आहे.
३) कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय संस्था कार्यरत असणे गरजेचे आहे .
४) संस्था पूर्ण वेळासाठी कार्यरत असणे बंधनकारक आहे .
५) संबंधित व्यक्ती हि पुरस्कार कार्यक्षेत्राची रहिवासी असणे बंधनकारक आहे.
सुरज फौंडेशन ही संस्था २००१ पासून शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थाच्या भविष्याचा वेध घेत आहे. या संस्थेच्या मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, गुरुकुल, सुरज स्पोर्ट्स अकॅडमी शाखा सांगली, म्हैशाळ, उत्तूर, या ठिकाणी कार्यरत आहेत.
क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविणारी सुरज फौंडेशन ही पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव अग्रगण्य संस्था आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, JEE NEET, वसतीगृह, विमा संरक्षण, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, आधुनिक शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखले जाते, संस्थेत वृक्षारोपण, शिक्षक – पालक मेळावा, पूरग्रस्तांना मदत, ग्रीन एम.आय.डी.सी,
क्लीन एम.आय.डी.सी. स्वच्छता मोहीम, वृद्धांची आरोग्य तपासणी, भव्य आयपील क्रिकेट स्पर्धा, जिल्हास्तरीय हिंदी काव्य गायन स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील बिंदू चित्र स्पर्धा व प्रदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
तरी संबंधीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी आपले प्रस्ताव दिनांक २१ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरज फौंडेशन पी. ६१ एम.आय.डी.सी. कुपवाड, जि. सांगली पिन कोड ४१६ ४३६ या पत्यावर पाठवावे असे आव्हान संस्थेचे सचिव मा. श्री. एन. जी. कामत यांनी केले आहे.