Thursday, June 20, 2024
spot_img
Homeराज्यचतारी येथे आज बुद्धमुर्ती स्थापना वर्धापन दिन व चिवरप्रदान समारंभ...

चतारी येथे आज बुद्धमुर्ती स्थापना वर्धापन दिन व चिवरप्रदान समारंभ…

पातूर :- निशांत गवई

पातूर तालुक्यातील विश्वशांती बुद्धविहार, चतारी येथे गुरवार दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी तथागत बुद्धमुर्ती स्थापना वर्धापन दिन व चिवरप्रदान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्वशांती बुद्धविहार, चतारी, येथे दि. २८ डिसेंबर २०१६ रोजी जग‌द्विख्यात बुद्धमुर्ती शिल्पकार आयु. सुरेशजी खंडेराव, नाशिक यांच्या संकल्पनेतून २८ फुट लांबीची महापरिनिब्बान अवस्थेतील बुद्ध मुर्ती २८ तासात साकारली आहे.त्याबाबत बुद्ध मुर्ती स्थापना वर्धापन दिन व चिवरप्रदान उपस्थित भिक्षु संघ भदन्त गुणरत्न महाथेरो जेतवन महाबुध्दविहार, नंदुरबार यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडी अंजलीताई आंबेडकर व सुजात आंबेडकर हे राहतील तर प्रमुख वक्ते प्रा.विशाल नंदागवळी अकोला,प्रमुख पाहुणे से.नि. कृषि संचालक (म.रा.) शुध्दोधन रामभाऊ सरदार,तहसिलदार बाळापूर राहुल तायडे,वरिष्ठ पोलिस निरिक्षक सेवानंद वानखडे,आर.टी.ओ. अकोला संदिप तायडे,अस्थिव्यंगोपचार तज्ञ डॉ. अजय सुरवाडे, विशेष सहकार्य सिध्दार्थ नवयुवक मंडळ, विवरा, भिमशक्ती क्रिडा मंडळ, बोथाकाजी शिलवंत तरुण मंडळ, पिं. खुटा आनंद नवयुवक मंडळ,

वाहाळा खु. ,जेतवन बुध्दविहार समिती, चान्त्री भिमशक्ती क्रिडा मंडळ, सुकळी नवज्योती तरुण उत्साही मंडळ, शहापूर , सिध्दार्थ तरुण मंडळ, चांगेफळ , भिमशक्ती तरुण मंडळ सस्ती आनंद क्रिडा मंडळ, वाडेगांव न्यु प्रसेनजित क्रिडा मंडळ, तुलंगा खु. समता सैनिक दल, तुलंगा बु. प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष, प्रमोद देंडवे ,महासचिव मिलींद इंगळे, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, समाजकल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे, युवा आघाडी पातुर अध्यक्ष, चंद्रकांत तायड,राजु बोरकर,

आयु. ज्ञानेश्वर सुलताने

गटनेते, जि.प. अकोला

आयु. डॉ. ओमप्रकाश धर्माळ

अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पातुर तालुका

आयु. शरद सुरवाडे

तालुका महासचिव, वंचित बहुजन आघाडी, पातुर

आयु. धम्मपाल सोनोने

कॉन्ट्रेक्टर, कार्ला

  • कार्यक्रमाची रुपरेषा –
  • सकाळी ७ वा. : धम्मध्वजारोहण, वंदना व परित्राणपाठ दुपारी १ ते २: सामाजिक प्रबोधन
  • सकाळी ११ वा. चिवरप्रवान सोहळा

दपारी १२ ते १: भिक्ष संघ धम्मदेसना

दुपारी २ ते ६ भोजनदान

सायंकाळी ६ ते १० : बुद्धभिम गितांचा कार्यक्रम

महामाया उपासिका संघ, चतारी भिमशक्ती क्रिडा मंडळ, चतारी बौद्ध उपासक व उपासिका तसेच समस्त गांवकरी मंडळी,उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: