Sunday, December 22, 2024
Homeराज्यमुरबाड मध्ये माजी सभापती कडून क्रूर घटना… जुन्या वादातून जीवघेणा हल्ला, तरुणाचे...

मुरबाड मध्ये माजी सभापती कडून क्रूर घटना… जुन्या वादातून जीवघेणा हल्ला, तरुणाचे हात छाटले…

कल्याण – प्रफुल्ल शेवाळे

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातून अत्यंत धक्कादायक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. एका जुन्या भांडणाच्या रागातून माजी सभापतीने तरुणाचे दोन्ही हात मुळापासून छाटून टाकल्याची अत्यंत भयकंर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे..

उपलब्ध माहिती नुसार
काल संध्याकाळी दि. 15 डिसेंबररोजी मुरबाड बारवी धरण रस्त्यावर विस्डम शाळेसमोर देवपे गावातील तरुण सुशील भोईर (वय 27 वर्ष) हा रिक्षाने जात असताना मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ हे आपल्या साथीदारांसह कारने येऊन रिक्षा अडवली. सुशीलला बाहेर काढून तलवारीने सपासप वार करीत दोन्ही हात छाटून टाकले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ आणि सुशील भोईर यांच्यात काही मुद्द्यांवरून जुना वाद होता. याच गोष्टीचा राग श्रीकांत धुमाळ यांच्या मनात होता. त्याचाच बदला घेण्यासाठी त्यांनी कट रचून सुशील भोईर याच्यावर हल्ला चढवला.

याप्रकरणी श्रीकांत धुमाळ याच्यासह त्याचा मेहुणा अंकुश खारीक, नितीन धुमाळ व इतर यांच्यावर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: