Saturday, December 21, 2024
Homeराज्यसरकारच्या जन हितोपयोगी योजना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचवा - माजी...

सरकारच्या जन हितोपयोगी योजना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचवा – माजी आमदार राजेंद्र जैन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

क्षेत्रात खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वामध्ये अनेक विकासाची कामे झाली आहेत. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या धानाला बोनस, लाडली बहन योजना, मुलींना उच्च शिक्षणात मोफत शिक्षण, एस टी बस मध्ये ५० टक्के सवलत असे अनेक महिलांच्या हिताची कामे झाली आहेत. महायुती सरकारच्या वतीने अमलात आणलेली अनेक जन हिताची कामे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे कार्यकत्यांना संबोधतांना माजी आमदार राजेंद्र जैन बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काटी जिल्हापरिषद क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक कबीर आश्रम काटी येथे माजी आमदार राजेंद्र जैन, कुंदन कटारे, गणेश बरडे, केतन तुरकर,अखिलेश सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

जैन पुढे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी कामाला लागून युवक व महिलांना सक्रियतेने विविध योजनांचा लाभ देण्याचे कार्य करावे तसेच प्रत्येक बुथ वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची कमेटी बनविण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राजेंद्र जैन, कुंदन कटारे, गणेश बरडे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, रजनी गौतम, माणिक पडवार, राजेश जमरे, सुनील पटले, शैलेश वासनिक, सतीश कोल्हे, अनिल बावनकर, प्रकाश बरैय्या, आरजू मेश्राम, चंद्रकुमार चौहान, प्रकाश नेवारे, विश्वनाथ चौधरी, प्रेमलाल बरैय्या, नूतनलाल बिजेवार, नंदकिशोर हरिणखेडे, मकसूद कुरेशी, इंदल चौहान, छन्नूलाल तुरकर, मतीन कुरेशी, सोमाजी नेवारे, नंदकिशोर कावरे, भुवन हलमारे, लोकेश जगणे, महेश नेवारे, देवेंद्र पटले, प्रकाश तिजारे, किशोर पारधी, किशोर माने, महेश खरे,

विनोद माने, घनश्याम पाचे, आकाश माने, गुनाराम मानेश्वर, छगनलाल बिसेन, विजय पंजरे, सुरेंद्र उदापूरे, रामेश्वर चौधरी, कुवर तुरकर, राकेश कुमरे, अनिरुद्ध जमरे, डालीराम बाहे, शुभम मेश्राम, सरोज बोरकर, विशाल बोरकर, हरी कटंगकर, निकुंज तिवारी, सणत पाचे, जयराम भोयर, देवेंद्र धार्मिक, जितेंद्र धार्मिक, लोकेश बावनकर, अतितकुमार तुरकर, दिनेश चौधरी, संभू असाटी, राकेश ठाकरे, अमोल टेकाम, संतोष ठाकरे, राजेश भातपिरे, संतोष पाचे, सदाशिव नागेश्वर, येशू कावरे, सेवक पंजरे, दिनेश पाचे, धर्मेंद्र परिमल, राजू तुरकर सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: