उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब असल्याची माहिती लखनऊ पोलिसांना दिल्ली नियंत्रण कक्षाकडून मिळाल्याने खळबळ उडाली. सदर माहिती मिळताच बॉम्बशोधक पथकासह मोठ्या संख्येने पोलिस दलाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची कसून झडती घेतली.
गौतमपल्ली निरीक्षक सुधीर अवस्थी यांनी सांगितले की, सध्या ही माहिती खोटी आहे. दिल्ली पोलिसांनीही ही माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे. माहितीची पडताळणी केली असता, दिल्ली नियंत्रण कक्षाला अनेक राज्यांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती एकाच भाषेत मिळाली होती, त्यानंतर ही माहिती लखनऊ पोलिसांना देण्यात आली. सध्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
LIU टीम आणि गौतमपल्ली इन्स्पेक्टर घटनास्थळी पोहोचले असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. मात्र कुठेही बॉम्ब आढळून आला नाही. माहिती देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे, सध्या त्याचा मोबाईल नंबर बंद आहे.