सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत नवनीत राणा यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रात कोणताही दोष नाही. आज नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे.
अमरावती, महाराष्ट्रातील भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावर न्यायमूर्ती जे. महेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. उच्च न्यायालयाने प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता.
नवनीत राणा सध्या अपक्ष खासदार म्हणून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०१३ मध्ये नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र मिळाले होते. नवनीत राणा यांना मोची जातीचे प्रमाणपत्र दिले होते. जात पडळताडणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवला होते. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा हा निर्णय रद्द करत त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्या मोची नसून पंजाबी चर्मकार असल्याचा दावा याचिकाकर्ते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता.
8 जून 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते की, नवनीतने बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करून मोची जात प्रमाणपत्र मिळवले होते. हायकोर्टाने त्याला दोन लाखांचा दंडही ठोठावला होता, मात्र आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
[BREAKING] Supreme Court grants relief to MP Navneet Rana, sets aside cancellation of her caste certificate#SupremeCourt #NavneetRana
— Bar & Bench (@barandbench) April 4, 2024
Read full story: https://t.co/EwoxKUBlBb pic.twitter.com/GkgLzEG1gc