Thursday, December 5, 2024
Homeक्रिकेटViral Video | शाहरुखने ऋषभ पंतला बघताच मिठी मारली...

Viral Video | शाहरुखने ऋषभ पंतला बघताच मिठी मारली…

Viral Video : KKR (KKR vs DC) ने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि 106 धावांनी विजय मिळवला. केकेआरच्या विजयानंतर शाहरुख खानने सर्व खेळाडूंची भेट घेतली. एवढेच नाही तर शाहरुखने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचीही भेट घेतली.

पंतला भेटल्यानंतर शाहरुखही खूप भावूक दिसला. वास्तविक, जेव्हा शाहरुख पंतला भेटला तेव्हा तो त्याला खूप प्रेरित करताना दिसला. पंत आणि शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख पंतशी बराच वेळ बोलला. शाहरुख ज्या पद्धतीने दिल्लीच्या कॅप्टनशी बोलतोय ते पाहता तो त्याला खूप काही समजावतोय असं वाटतंय.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ सामना जिंकू शकला नसला तरी संघाच्या कर्णधाराने अर्धशतक झळकावून मने जिंकली. पंतने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी खेळली. या सामन्यात पंतने 25 चेंडूत 55 धावांची खेळी केली. पंतने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार मारले होते. याआधीच्या सामन्यातही पंतने CSK विरुद्ध अर्धशतक झळकावले होते.

त्याचबरोबर केकेआर आता पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या मोसमात केकेआरने सलग तिसरा सामना जिंकला आहे. नेट रन रेटमध्येही केकेआर आता इतर संघांपेक्षा पुढे असल्याचे दिसून येत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: