Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsमोठी बातमी | महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का...माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष...

मोठी बातमी | महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का…माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला…

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेले मिलिंद देवरा दीर्घकाळापासून पक्षावर नाराज होते, असे सांगितले जात आहे. आता ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे.

मिलिंद देवरा यांनी ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप करत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचं काँग्रेस पक्षाशी असलेलं ५५ वर्षांचं नातं आज संपुष्टात येतंय. माझे सर्व वरिष्ठ नेते, सहकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानतो. त्यांनी वर्षानुवर्षे देवरा कुटुंबाला साथ दिली, त्यामुळे त्यांचे आभार आहे, असं देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मिलिंद देवरा हे काँग्रेसचे मुंबईतील मोठे नेते आहेत. दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. त्यांनी 2004 आणि 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात देवरा हे राज्यमंत्री होते. 2014 आणि 2019 मात्र मिलिंद देवरा यांचा पराभव झाला. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांना पराभूत केलं. आता मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: