Saturday, July 27, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीअकोला | दारूच्या नशेत मित्रालाच संपविले...आरोपी अटकेत

अकोला | दारूच्या नशेत मित्रालाच संपविले…आरोपी अटकेत

अकोला शहरात हत्येचं सत्र थाबायचं नाव घेत नसून काल रात्री सुद्धा एका खुनाची घटना समोर आलीय, घडलेल्या खुनेच्या घटनेने अकोला शहर पुन्हा हादरलय. काही दिवसांपूर्वी एका निष्पाप विद्यार्थ्याची क्षुल्लक कारणाने हत्या झाली होती. काल रात्रीच्या सुमारास शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील जुना केरोसीन डेपो जवळ पुन्हा एका युवकाची हत्या करण्यात आलीय. मनोज कामेल्लू असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून दारू पिण्याच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मनोज या युवकाची हत्या धारदार शास्त्राने, डोक्यावर जोरदार वार केल्यामुळे झाल्याचं प्रथमदर्शी दिसून येत आहेय..मृत हा शहरातील दुबेवाडी येथील राहणारा असून मनोज कामेल्लू अस या युवकाचं नाव आहेय…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या मनोज खून प्रकरणातील आरोपी सोनू संगे वय 32, रा.रेल्वे क्वार्टर, सातव चौकाजवळ, याला काही मिनिटांतच एलसीबीने ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. हत्येचं कारण असे आहे की, आरोपीने दारू पिऊन हा गुन्हा केला होता दारूच्या नशेत शिवीगाळ करून खून झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दोघेही गेल्या 10 वर्षांपासून मित्र होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: