Sunday, December 22, 2024
Homeराज्यभिवंडी लोकसभा खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचा शहापूर दौरा… तालुक्यातील रेल्वे...

भिवंडी लोकसभा खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचा शहापूर दौरा… तालुक्यातील रेल्वे प्रवासी संघटनेकडून समस्यांचा पाढा जाहीर…

शहापूर – प्रफुल्ल शेवाळे

भिवंडी लोकसभा खासदार सुरेश (बाळ्या मामा )म्हात्रे यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रथमच शहापूर दौरा केला आहे.. यात प्रामुख्याने तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्ग वरील ट्रॅफिक समस्या,खूप अडचणीची झालीये यात अनेक वाहने तासंतास अडकून पडतात आणि लोकांना आपल्या इच्छित स्थळी पोहचणे साठी वेळ लागत असतो.. याबाबत खासदार म्हात्रे यांनी महामार्ग चे अधिकारी आणि RTO च्या अधिकारी वर्गसोबत बोलून सदर वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत..

या मध्ये रस्ता डागडुजी, वासिंद पूल आणि आसनगाव रेल्वे पुलाची कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानंतर खासदारानी दोन दिवसा पूर्वी शहरात आलेल्या पूर परिस्थिती ची पाहणी केली,यामध्ये शहापूर तहसीलदार सौ. कोमल ठाकूर यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळणे बाबत सूचना केल्या. तालुक्यातील अनेक नागरिकांनी खासदारांना, ग्रामपंचायत पदाधिकारी वर्गानी निवेदन सादर केली.यानंतर तालुक्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक असलेले आसनगाव स्थानकात खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी भेट दिली.

यामध्ये कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे समस्या आणि संबंधित प्रश्नांचा अक्षरशः पाढा वाचला. यात आसनगाव होम प्लॅटफॉर्म, आसनगाव पूर्व पश्चिम पूल,कल्याण कसारा तिसरी चौथी लाईन याबाबत चर्चा करण्यात आली.. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयांना कसारा येथे थांबा मिळावा, आसनगाव, कसारा लोकल वाढवायला पाहिजे असे मूलभूत प्रश्न खासदार यांच्या समोर मांडले आहेत.

याबद्दल रेल्वे अधिकारी यांनी काही समस्या या राज्य सरकार च्या परवानगी ने नक्कीच सुटतील असं म्हटलं आहे. यावर खासदार बाळ्या मामा यांनी राज्य सरकार कडून जी काही प्रलंबीत प्रकरणे आहेत त्याची तपशील वार माहिती सादर करा अशा सूचना रेल्वे अधिकारी वर्गाला दिल्या आहेत. कल्याण कसारा रेल्वे संघटनेकडून अध्यक्ष शैलेश राऊत, सचिव उमेश विशे, रेल्वे प्रवासी महासंघ सरचिटणीस जितेंद्र विशे, महासंघ कार्याध्यक्ष धनगर सर,पत्रकार आणि सदस्य महेश तारमाळे,टिटवाळा स्थानक प्रतिनिधी प्रफुल्ल शेवाळे, अजय गावकर,

कल्याण कसारा कर्जत संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, विभागीय अध्यक्ष विजय देशेकर, राहुल दोंदे, आकाश डोळस, आरती भोईर, युवराज पंडित, रेल्वे महासंघ चे नंद कुमार देशमुख, मा. आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट )चे विद्या वेखंडे, मनोज विशे आणि पदाधिकारी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या शहापूर दौऱ्या सोबत कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील समस्या आणि उपाय योजना करणे साठी रेल्वे प्रवासी महासंघाचे सरचिटणीस श्री जितेंद्र विशे यांनी विशेष प्रयत्न करून खासदारांना आसनगाव स्थानकात भेट घडवून आणली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: