रामटेक – राजु कापसे
रामटेक दिनांक 21/2/2024 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर नागपूर या ठिकाणी भारतरंग महोत्सवाचा आयोजन करण्यात आले होत. या आंतरराष्ट्रीय रंग महोत्सवाला एक वेगळेच रंग प्राप्त झाले होते. भारत रंग महोत्सवाच्या या पंचवीस व्या व्सिल्वर जुबली म्हणजे रजत महोत्सव संपूर्ण भारत भर साजरा करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्कृतीची देवाणघेवाण या उद्देशाने भारत सरकारने या रंग महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवात रामटेकच्या जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक तर्फे शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी महाराष्ट्राची पारंपारिक लोक कला पारंपारिक गोंधळ या माध्यमातून भारतीय रंग महोत्सवात विकसित भारत या विषयावरआपली कला सादर करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
तसेच शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी लो आ गई मेरी वापस अपनी सोने की चिडिया चे उत्कृष्ट गायन केले.त्याचप्रमाणे शाहीर टेंभुर्णे गुरुजी सार्वजनिक वाचनालय रामटेक तर्फे खडीगंमत या माध्यमातून विकसित भारत ही संकल्पना साकार केली शाहीर ज्ञानेश्वर माणिक तायवाडे यांनी या ग्रुपचे संचालन केले.
दि लॉर्ड अशोका बॅकवर्ड मल्टीपर्पज सोसायटी रामटेक द्वारा वसुदेव कुटुंबकम कलापथकातून सादर केले तसेच चैतालीभजन दंडार मंडळ व शारदा महिला भजन मंडळ यांनी सुद्धा वसुदेव कुटुंबकम आणि विकसित भारत या विषयावर आपली लोककला सादर केली. व या ऐतिहासिक क्षणाचे सर्व साक्षीदार झालेत.
अशा प्रकारे सर्व उपस्थित असलेले या रंगात नाहून निघाले.व या रंगात रंगून गेले त. अशाप्रकारे हा आपला भारत रंग महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी एकमेकांचे आभार व्यक्त केले व महोत्सवाची सांगता केली.